Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

School Reopening 2025: शाळा प्रवेशोत्सव २०२५ अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड तालुक्यातील शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले. शिक्षणाच्या गुणवत्तेबरोबर पर्यावरणसंवेदनाही देण्याचा संदेश त्यांनी दिला.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News: शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमाअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.१६) शाळेच्या पहिल्याच दिवशी दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आलेगाव पुनर्वसन या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शालेय साहित्य आणि गणवेश मिळाल्याने विद्यार्थी भारावून गेले होते. या वेळी गट विकास अधिकारी महेश ढोके, गटशिक्षणाधिकारी संजय महाजन, विस्तार अधिकारी शरिफा तांबोळी, केंद्र प्रमुख आशा धाडगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरधवल (बाबा) जगदाळे आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
Ajit Pawar : ‘सीडसा’ प्रयोगशाळांसाठी उरणीसाठी ९० कोटी देणार

या वेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की भावी पिढी घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासोबतच सर्व शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बूट उपलब्ध करून देण्यात येत आहेत, याकरिता राज्य शासन शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : गुणवत्ता राखून कामे वेळेत पूर्ण करा

विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडीअडचणी येणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात येत आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्यादृष्टीने अध्यापन केले गेले पाहिजे. राज्य शासनाने १० कोटी वृक्ष रोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे.

यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांवर पर्यावरण विषयक संस्कार होण्यास मदत होईल, या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे, असेही श्री. पवार म्हणाले.श्री. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले. या वेळी आलेगाव पुनवर्सनचे सरपंच नवनाथ झुंबर कदम, मुख्याध्यापिका अनिता खताळ, ग्रामसेवक अर्चना भागवत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी कुतवळ आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com