Fertilizer Linking : खते खरेदी करताना लिंकिंग करू नये यासाठी दक्षता घ्यावी

Kharif Season : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खताची खरेदी करताना कंपन्यांमार्फत कृषी केंद्रचालकांकडून लिंकिंग करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

HIngoli News : यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खताची खरेदी करताना कंपन्यांमार्फत कृषी केंद्रचालकांकडून लिंकिंग करण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची मे अखेरपर्यंत तपासणी पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १४) आयोजित खरीप हंगाम २०२५ पूर्वतयारीचा आढावा बैठक गुप्ता यांच्या अध्यक्षेत झाली. या वेळी आमदार तानाजी मुटकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे तालुका कृषी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, की पीक विमा व अतिवृष्टी अनुदानाच्या प्रलंबित लाभार्थ्यांची ई-केवायसी तत्काळ करून त्यांना अनुदानाचे वितरण करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरींना मागेल त्याला सौर पंप योजनेतून तत्काळ वीज जोडणी द्यावी. यासाठी योग्य कंपनीची निवड करावी. गारपिटीमध्ये नुकसान झालेल्या सोलारचे सर्वेक्षण करून ते तत्काळ दुरुस्त करावेत.

Fertilizer
Fertilizer Linking : बनावट ग्राहकांद्वारे शोधणार खतांची लिंकिंग

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, एसआरएलएम आदी योजनेच्या प्रलंबित प्रस्तावाची बँकनिहाय माहिती तयार करून द्यावी व ती प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत. सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना फळबाग लागवड योजना, हळद लागवड, रेशीम शेती क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष भर द्यावा.

Fertilizer
Fertilizers Linking : खतांच्या लिंकिंगबाबत कंपन्यांवरही कारवाई करावी : अंबादास दानवे

जिल्ह्यात एक हजार एकरवर तुती लागवडीसाठी प्रयत्न करावेत. आमदार मुटकुळे म्हणाले, की जिल्ह्यात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. परंतु सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मका पिकाकडे वळला पाहिजे.

कदम यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम नियोजनाबाबत माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी २९ मे ते १२ जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com