ST Workers: एसटी महामंडळ, कामगारांच्या सरकार पाठीशी; उपमुख्यमंत्री पवार

Maharashtra ST: एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, अशी भूमिका असून एसटी कामगारांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
ST Workers
ST WorkersAgrowon
Published on
Updated on

Pune News: एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, अशी भूमिका असून एसटी कामगारांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांचा अमृतमहोत्सव सोहळा व त्यानिमित्त आयोजित कामगार परिषदेत ते बोलत होते.

हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, माजी आमदार रवींद्र धंगेकर, सुनील टिंगरे, ‘म्हाडा’चे माजी उपाध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

ST Workers
ST Smart Card : एसटीचे स्मार्ट कार्ड आगारात धूळ खात

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील शहरांचा विस्तार झाल्यामुळे एसटीच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या आहेत. त्या ठिकाणी एसटी स्थानकांचा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पी.पी.पी.) विकास करण्यासाठी कराराचा कालावधी ३०-३०-३० वर्षे असा वाढविण्याचे धोरण अंमलात आहे.

ST Workers
ST Student Pass : शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत

तथापि, कमी कालावधीमुळे विकसक पुढे येत नसल्याने आता यात बदल करून आधी ४९ व नंतर ४९ वर्षे असा ९८ वर्षांपर्यंत करार वाढविण्याचे नवीन धोरण राज्य शासन आणत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळतील.उद्योगमंत्री सामंत म्हणाले, की एसटी कामगारांना देशात सर्वाधिक वेतन देणारे आपले एसटी महामंडळ आहे.

राज्य औद्योगिक विकास महामंडळाने एसटी स्थानकांच्या विकासासाठी ६०० कोटी रुपये दिले असून त्यातून विविध थांब्यांचा विकास करण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणची स्थानके बस पोर्टल म्हणून विकसित होणे गरजेचे आहे. स्थानकांवर चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी एसटी कामगार आग्रही पाहिजेत.

यावेळी श्री. ताटे आणि त्यांच्या पत्नी यांचा उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री. ताटे यांनी सन्मानाला उत्तरपर भाषण दिले. कामगार नेते बाबा आढाव यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com