Hingoli News : शासनाने ८५ लाख महिला बचतगट स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवून दोन कोटी लखपती दीदी बनविण्याचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी केले.
फाळेगाव (ता.हिंगोली) येथील विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केंद्रीय मंत्री यादव बोलत होते. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार रामराव वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, सरपंच लक्ष्मीबाई आसोले, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी,
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. बोंद्रे, गणेश वाघ, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, विभागीय वन अधिकारी मनोहर गोखले आदी उपस्थित होते.
यादव म्हणाले, की २०४७ पर्यंत मजबूत भारत बनवण्याचा संकल्प आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांना आयुष्यमान कार्ड देण्यात येत आहे. कार्डाच्या माध्यमातून आजारी नागरिकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराची सोय झाली आहे. प्रत्येकाला पक्के घर, हर घर नल से जल, स्वच्छतागृह, वीज उपलब्ध करुन देण्यासाठी शासन विविध योजना राबवत आहे.
पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येकाला पक्के घर देण्याचे काम शासन करीत आहे. रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना सुरु केली आहे. सर्व वंचित घटकातील समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आपल्या गावापर्यंत येत आहे. प्लॅस्टिक मुक्त व कचरा मुक्त भारत बनविण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे.
यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, दिव्यांगांना ग्रामपंचायतीतर्फे धनादेश वाटप, इतर लाभाचे वितरण करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.