Aayushman Bharat : आयुष्यमान योजनेत देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असेल : डॉ. शेटे

Dr. Omprakash Shete : आयुष्यमान योजनेच्या अंमलबजावणीत संपूर्ण देशभरात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्‍वास आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केला.
Dr. Omprakash Shete
Dr. Omprakash SheteAgrowon
Published on
Updated on

Solapur News : आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी अतिशय गतिमान पद्धतीने प्रक्रिया राबवावी.

या योजनेच्या अंमलबजावणीत संपूर्ण देशभरात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असेल, असा विश्‍वास आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुष्यमान भारत/ महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधा बाबत डॉ. शेटे यांनी आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते.

Dr. Omprakash Shete
Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप १३ लाख टनांवर

या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा समन्वयक डॉ. माधव जोशी, डॉ. दिलीप वाघमारे, ज्ञानेश्‍वर सोळुंके उपस्थित होते.

डॉ. शेटे म्हणाले, की महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना गोल्डन कार्ड देण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास ९० टक्के नागरिकांना या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचे आरोग्य उपचार मोफत केले जाणार आहेत.

Dr. Omprakash Shete
Onion Rate : कांदा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी

यासाठी राज्यभरात जवळपास एक हजार खासगी रुग्णालय पॅनेलवर आहेत व लवकरच आणखी ३५० रुग्णालयांना पॅनेलवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या जवळच्या रुग्णालयात आरोग्य उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ५१ रुग्णालये पॅनेलवर असून, जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी मोहोळ व अक्कलकोट तालुक्यांत एकही रुग्णालय पॅनेलवर नाही. आरोग्य यंत्रणेने या दोन्ही तालुक्यांसह जिल्ह्यातील पॅनेलवरील रुग्णालयांची संख्या वाढविण्यासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवावेत. तसेच प्रत्येक तालुक्यात किमान पॅनेलवरील रुग्णालयांची संख्या दोन असली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश डॉक्टर शेटे यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com