Devendra Fadnavis Speech: अहिल्यादेवीचे यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी: देवेंद्र फडणवीस

Ahilyadevi Holkar: ‘‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वंचितांसाठी राज्य चालवले. त्याच पद्धतीने महायुतीचे सरकार वंचितांसाठी काम करीत आहेत. अहिल्यादेवी यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
Punyashlok Tercentenary Birth Anniversary Celebrations of Rajmata Ahilyadevi Holkar
Punyashlok Tercentenary Birth Anniversary Celebrations of Rajmata Ahilyadevi HolkarAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: ‘‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी वंचितांसाठी राज्य चालवले. त्याच पद्धतीने महायुतीचे सरकार वंचितांसाठी काम करीत आहेत. अहिल्यादेवी यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अहिल्यादेवींनी स्वखर्चातून बांधलेले तलाव, विहिरी, घाट याच्या संवर्धनासह त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करण्यात येणार आहे. तसेच, आदिशक्ती अभियानही आम्ही राबवत आहोत,’’अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

चौंडी (ता. जामखेड) येथे शनिवारी (ता.३१) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे व बबनराव पाचपुते, दुग्धविकासमंत्री अतुल सावे, जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते.

Punyashlok Tercentenary Birth Anniversary Celebrations of Rajmata Ahilyadevi Holkar
Devendra Fadnavis: पाकव्याप्त काश्मीरसारखी काँग्रेस पाकव्याप्त झाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा देशभर साजरा होत आहे. अहिल्यादेवींनी २८ वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा आदर्श राज्यकारभार केला. त्यांनी निर्माण केलेले वैभव देशभरात पाहायला मिळते. आदिशक्ती अभियान आम्ही राबवीत आहोत. अहिल्यादेवी होळकर यांनी वंचितांसाठी राज्य चालवले. त्याच पद्धतीने महायुतीचे सरकार वंचितांसाठी काम करीत आहेत.

Punyashlok Tercentenary Birth Anniversary Celebrations of Rajmata Ahilyadevi Holkar
CM Devendra Fadnavis: भूसंपादन प्रक्रिया दलाल लॉबीने हायजॅक केली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की अहिल्यादेवींनी यशाचा पाया रचला. प्रजेसाठी रोजगार निर्मिती करण्याची त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. तसेच जलसंधारणाचे काम, अनाथ, दिव्यांगांसाठी काम केले. जनहित डोळ्यासमोर ठेवून अनेक आदर्शवत काम केले. त्याच धोरणाने महायुती सरकार काम करीत आहे. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कितीही अफवा पसरविल्या तरी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. राम शिंदे यांनी केले.

फडणवीस, शिंदे एका महिन्यात दोनदा चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चौंडी हे जन्मगाव असून येथे त्यांचे स्मारक आहे. ६ मे रोजी चौंडीत राज्यमंत्री मंडळाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. त्यानंतर पंचवीस दिवसांनीच पुन्हा एकदा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा चौंडीत आले. अजित पवार यांची मात्र कार्यक्रमाला गैरहजेरी होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com