Agrowon Agriculture Exhibition : ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शन आजपासून

शेतकऱ्यांचा कैवार घेऊन कृषी क्षेत्रात विविध मानदंड प्रस्थापित करणाऱ्या ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन आजपासून (ता. १३) औरंगाबादमध्ये सुरू होत आहे.
Agrowon Agricultural Exhibition
Agrowon Agricultural ExhibitionAgrowon

औरंगाबाद : शेतकऱ्यांचा कैवार घेऊन कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) विविध मानदंड प्रस्थापित करणाऱ्या ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन (Sakal Agrowon Agriculture Exhibition) आजपासून (ता. १३) औरंगाबादमध्ये सुरू होत आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र (Modern Agriculture) व प्रयोगशील कृषी व्यवस्थेची गाथा सांगणाऱ्या या प्रदर्शनामुळे मराठवाड्याच्या भूमीत एक आगळावेगळा कृषी ज्ञानसोहळा भरतो आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या प्रदर्शनाला राज्यासह परराज्यातून हजारो शेतकरी भेट देणार आहेत.

Agrowon Agricultural Exhibition
Agrowon Agri Exhibition : ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमधील ‘कलाग्राम’ परिसरात १६ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाला शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सभासद हजेरी लावणार आहेत. याशिवाय कृषी आधारित व्यवसायातील शेतकरी व अभ्यासक, कृषी शिक्षणातील विद्यार्थी, तसेच कृषी संलग्न कंपन्या, संस्थांचे प्रतिनिधीदेखील मोठ्या संख्येने भेट देणार आहेत.

Agrowon Agricultural Exhibition
Agrowon Agriculture Exhibition : ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनात ज्ञानाचा जागर

या ठिकाणी शेतकऱ्यांना राज्यातील मान्यवर शास्त्रज्ञ, कृषी तज्ज्ञ, संशोधक व अभ्यासकांचे मार्गदर्शन ऐकण्याची व त्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक कन्हैया अॅग्रो आहेत. तसेच बसवंत गार्डन असोसिएट पार्टनर आहेत. याशिवाय के-बी, चितळे डेअरी, एमआयटी औरंगाबाद, तृप्ती हर्बल, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मेडा-महाऊर्जा, आत्मा-औरंगाबाद हे को-स्पॉन्सर्स आहेत; तर इफ्को हे गिफ्ट स्पॉन्सर्स आहेत.

शेतकऱ्यांचा पाठीराखा

शेती करताना राज्याच्या कानाकोपऱ्यांतील शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांना सतत समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र संकटाच्या प्रत्येक वळणावर शेतकऱ्यांच्या पाठीशी ‘ॲग्रोवन’ ठामपणे उभा असतो.

संकटांशी सामना करीत आदर्श शेती करणाऱ्या तसेच शेतीपूरक व्यवसाय व विविध प्रयोग करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या यशोगाथा ‘अॅग्रोवन’मधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. या दैनंदिन उपयुक्त माहितीबरोबर ‘अॅग्रोवन’चे विविध उपक्रम आणि त्याच मालिकेतील प्रभावी कृषी प्रदर्शन राज्याच्या कृषी व्यवस्थेत नवी उमेद निर्माण करीत असते.

फळांचे प्रदर्शन ठरणार आकर्षण

विविध कृषी संशोधन संस्था, कृषी संबंधित सरकारी व निमसरकारी विभाग, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. तसेच नामांकित ट्रॅक्टर कंपन्या आपल्या आधुनिक यंत्रांसह हजेरी लावत आहेत.

शेतकऱ्यांना यंदा हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर उद्योग, ड्रीप, टिश्युकल्चर अशा विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या उत्पादनांची माहितीदेखील मिळणार आहे. याशिवाय बसवंत गार्डनकडून आयोजित केलेले वैविध्यपूर्ण फळ प्रदर्शन शेतकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे.

विश्‍वासराव पाटील यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

प्रयोगशील शेतकरी कृषिरत्न विश्‍वासराव पाटील (लोहारा, जि. जळगाव) यांनी शाश्‍वत शेतीची तंत्र विकसित केली आहेत. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या शेतीतील शाश्‍वततेच्या प्रयोगांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘शाश्‍वत शेती विश्‍वासभाऊंची’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात साहित्यिक व निसर्गकवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते होणार आहे.

‘सकाळ प्रकाशना’ची निर्मिती असलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी (ता. १४) दुपारी १२ वाजता होईल. या निमित्ताने श्री. महानोर यांना ऐकण्याची संधी रसिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.

विनामूल्य प्रवेश, बक्षिसे जिंकण्याची संधी

प्रदर्शनाचा मुख्य उद्‌घाटन सोहळा शुक्रवारी दुपारी चार वाजता कृषी क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्याआधीच सकाळी १० वाजल्यापासूनच प्रदर्शनासाठी प्रवेश खुला असेल. प्रदर्शन आजपासून (ता. १३) सलग चार दिवस सोमवारपर्यंत (ता. १६) सकाळी १० ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

प्रदर्शनाच्या प्रवेशिका भरून देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दर अर्ध्या तासाला ‘लकी ड्रॉ’ काढला जाणार आहे. त्यातून शेती उपयोगी भेटवस्तू जिंकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com