Agrobo Technology : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'अॅगरोबो' किशोरवयीन मुलाने विकसीत केलं तंत्रज्ञान

Agrobo Technology Developed : आर्यन सिंह असे या सतरावर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याने आपल्या शाळेतील अटल टिंकरिंग लॅबमध्ये या अनोख्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे.
Agrobo Technology
Agrobo Technologyagrowon
Published on
Updated on

Modern Technology Farmers : शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत करण्याचे आवाहन नेहमीच केले जाते. दरम्यान राजस्थानातील कोटा शहरातील एका किशोरवयीन मुलाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'अॅगरोबो' हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रमानव विकसित केला आहे.

आर्यन सिंह असे या सतरावर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याने आपल्या शाळेतील अटल टिंकरिंग लॅबमध्ये या अनोख्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडून शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब हा उपक्रम राबविला जातो.

शेतकऱ्याचाच मुलगा असल्याने आर्यन बालपणापासून शेतीमधील समस्या जवळून पाहत होता. त्यातूनच त्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रमानव बनविण्याचे ठरविले. त्याने २०२० मध्ये त्याची सुरुवात केली. सुमारे चार वर्षांच्या कष्टानंतर बनविलेल्या या यंत्रमानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञान श्रेणीत पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवून दिला.

देशभरातील १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील हा पुरस्कार जिंकणारी नऊ मुले व दहा मुलींमध्ये आर्यन राजस्थानातील एकमेव होता. नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर, २२ जानेवारीला या सर्व मुलांसह त्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

Agrobo Technology
Kolhapur Dudh Sangh : दूध उत्पादकांना लुटणाऱ्या १६ दूध संस्थांना दुग्ध सहाय्यक निबंधकांकडून लेटर बॉम्ब

आर्यनने यंत्रमानवाचा प्रस्ताव नीती आयोगाच्या अटल नावीन्यता उपक्रम आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठविला. सर्वांनी याचे कौतुक केले.

अॅगरोबो' शेतातील कापणी, सिंचन, माती परीक्षण आदी अनेक कामे करू शकतो. यंत्रमानव बनविण्यासाठी ५० हजार रुपये खर्च आला असला तरी त्याचे उत्पादन वाढल्यावर हा खर्च कमी होईल. आर्यन सिंह, विद्यार्थी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com