
Nashik News : केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने व वेळेत उपलब्ध करणे तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३१ मेपूर्वा शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अभिमन्यू काशीद यांनी केले.
‘ॲग्रीस्टॅक’ हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने पोहचविण्यासाठी डिजिटल माध्यम आहे.
शासनाच्या विविध योजना, शेतकरी पीककर्ज, पीकविमा, किसान क्रेडिट कार्ड, हवामान अंदाज, पीएम किसान योजनेचे अनुदान, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ज्ञ मार्गदर्शन, नैसर्गिक आपत्ती मदत मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. शेतकरी ओळख क्रमांकासाठी आधार, पॅन कार्ड, बँक खाते तपशील, आधार संलग्न मोबाइल क्रमांक इत्यादी आवश्यक आहे.
५ लाख २० हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी
नाशिक जिल्ह्यात (ता. २९ जूनअखेर) ७ लाख ८४ हजार ७३६ खातेदारांपैकी ५ लाख २० हजार ८०० शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. ॲग्रीस्टॅक उपक्रमामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार असून विविध शेतकरी आणि कृषी केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.