
Sangli News : अॅग्रीस्टॅक योजना सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार ९९० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. मात्र अद्यापही नोंदणीसाठी शेतकरी पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे.
अॅग्रीस्टॅक योजना कृषी विभागाची आहे. नोंदणीची जबाबदारी कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाकडे आहे. मात्र या तिन्ही विभागामध्ये आजही समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. यामुळे याचा फटका अॅग्रीस्टॅक नोंदणीवर झाला आहे.
अॅग्रीस्टॅकची नोंदणी करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) ३५३, ग्रामसेवक ४९४ आणि कृषी सहायक ३१० असे ११७५ कार्यरत आहे. त्यांना १३७६ सहायक असून ६५० पथके आहेत. राज्य शासनाच्या कृषी खात्यामार्फत ही योजना राबविली जात आहे, असा आदेश आहे. मात्र, या योजनेची नोंदणी महसूल विभागाकडून केली जाते असेही स्पष्ट आहे.
जिल्ह्यात ९ लाख २२ हजार ८९३ शेतकरी आहेत. त्यापैकी ३ लाख ५२ हजार ९९० शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक योजनेत सहभाग नोंदवला आहे. दरम्यान, अॅग्रीस्टॅकची नोंदणी व्हावी यासाठी कृषी, ग्रामविकास आणि महसूल विभागाची सातत्याने आढावा बैठकही घेतली जात आहे.
मात्र नोंदणी होत नाही. त्यामुळे या तीनही विभागाने पुन्हा प्रचार प्रसिद्धीही करण्याचे नियोजन केले असून गावोगावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि जागृतीही केली जात असल्याचे चित्र आहे. जत तालुक्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. मात्र इतर तालुक्यांत शेतकऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत नोंदणी कमीच असल्याचे चित्र आहे. अद्यापही शेतकरी नोंदणीसाठी पुढे येत नसल्याचे दिसते आहे.
तालुकानिहाय अॅग्रीस्टॅकसाठी झालेली नोंदणी दृष्टिक्षेप
तालुका नोंदणी संख्या
खानापूर २१,६४६
कवठेमहांकाळ २८,४४६
तासगाव ३८,८३७
मिरज ४५,२६०
आटपाडी २३,३०६
पलूस २२,०२२
वाळवा ४९,४६९
जत ६७,३३६
कडेगाव २८,८४०
शिराळा २७,८२८
एकूण ३५२९९०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.