Agristack Scheme : अॅग्रीस्टॅक अंतर्गत ३ लाख ८५ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी बाकी

Farmer ID : अॅग्रीस्टॅक अंतर्गत २८ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील १०० टक्के शेतकरी नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु सर्व संबंधित विभाग, यंत्रणा यांच्याकडून शेतकऱ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल फारशी जाणीव जागृती न केल्यामुळे शेतकरी नोंदणी प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.
Farmer ID
Agristack YojanaAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : केंद्र शासनाने प्रत्येक शेतकरी खातेदारास एक विशिष्ट शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यासाठी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी अॅग्रीस्टॅक या डिजिटल उपक्रमाअंतर्गंत आजवर परभणी जिल्ह्यातील ४ लाख ६९ हजार ४२ पैकी २ लाख ६४ हजार ८१२ (५६.४६ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ६३ हजार ९९० पैकी १ लाख ८२ हजार ६८५ (५०.१९ टक्के) शेतकरी खातेदारांनी नोंदणी केली आहे.

याअंतर्गंत दोन जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. सोमवार (ता. १५) पासून कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे अॅग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना अडचणी येणार आहेत.

अॅग्रीस्टॅक अंतर्गत २८ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील १०० टक्के शेतकरी नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु सर्व संबंधित विभाग, यंत्रणा यांच्याकडून शेतकऱ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल फारशी जाणीव जागृती न केल्यामुळे शेतकरी नोंदणी प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे.

Farmer ID
Farmer ID Update: कृषीच्या सर्व योजनांसाठी आता शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य

बुधवारी (ता.१६) हिंगोली जिल्ह्यात केवळ १३१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली.परभणी जिल्ह्यातही नोंदणीचा वेग कमी आहे. सर्व्हर डाऊन, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आदी कारणांमुळेही नोंदणीस अडचणी येत आहे. कृषीच्या योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आल्यामुळे नोंदणीस वेग येईल, असे सूत्रांनी सांगितले.

पीएम किसान सन्मान योजनेतर्गत अनुदान लाभ, पीककर्ज, किसान क्रेडिट कार्ड, कृषी पायाभूत सुविधा निधी, शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे, पीकविमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत देय नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण या कामात शेतकरी ओळख क्रमांकामुळे सुलभता येणार आहे.

Farmer ID
Farmer ID : शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी बनवा

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत शेतकरी नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल. लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले, नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार-प्रचारात सफलता प्राप्त होईल. अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांकासाठी जनसुविधा (सीएससी) केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणी करता येईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्हा अॅग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी स्थिती

तालुका एकूण शेतकरी खातेदार नोंदणी केलेले शेतकरी टक्के

परभणी ७०६९० ४४४५० ६२.८८

जिंतूर ८७३५६ ४२२७६ ४८.३९

सेलू ५२१९६ ३०२९७ ५८.०४

मानवत ३५८९३ १९७०१ ५४.८८

पाथरी ४२६८८ २३०४७ ५३.९८

सोनपेठ २५८२९ १९९५८ ७७.२६

गंगाखेड ५६३५४ २७७७४ ४९.२८

पालम ४३०८३ २६०५४ ६०.४७

पूर्णा ५४९५३ ३१२५५ ५६.८७

हिंगोली ७१५२७ ३१७६१ ४४.४०

कळमनुरी ७८११८ ३७०९० ४७.४८

वसमत ८०१३० ४४८१८ ५५.९३

औंढा नागनाथ ५९१८५ ३३०९३ ५५.९१

सेनगाव ७५०३० ३५९२३ ४७.८८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com