Agristack Yojana : अॅग्रीस्टॅकच्या नोंदणीपासून अडीच लाख शेतकरी दूरच

Farmer ID : केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून या अंतर्गत शुक्रवार (ता. चार) अखेर ४७ टक्के शेतकरी खातेदारांची नोंदणी पूर्ण झाली.
Farmer ID
Agristack YojanaAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत असून या अंतर्गत शुक्रवार (ता. चार) अखेर ४७ टक्के शेतकरी खातेदारांची नोंदणी पूर्ण झाली. एकूण ४ लाख ७७ हजार ४४ शेतकऱ्यांपैकी २ लाख २४ हजार ५४४ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकची नोंदणी केली.

कृषिक्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जलद गतीने व परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी केंद्र शासनाची अॅग्रीस्टॅक डिजिटल अॅग्रिकल्चर मिशन योजना राबविण्यात येत आहे. यापुढे या नोंदणीच्या आधारेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय इतर मदत, नुकसान भरपाई मिळणेही या नोंदणीमुळे सोपे होणार आहे.

Farmer ID
Agristack Yojana : विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक

पंतप्रधान शेतकरी सन्मानच्या लाभार्थींची जिल्ह्यातील संख्या २ लाख ५७ हजार ७४४ आहे. यापैकी २ लाख २४ हजार ५४४ शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी केली आहे. पीएम किसानच्या लाभार्थींपैकी ३२ हजार ८०० शेतकऱ्यांनी अद्यापही अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही. राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकर ही नोंदणी करावी, अन्यथा पीएम किसानचे पैसे मिळण्यात अडचणी येतील.

शेतकरी स्वतः https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या लिंकवर जाऊन अॅग्रीस्टॅक नोंदणी करू शकतात. सीएससी केंद्रचालकांकडूनही ही नोंदणी मोफत करता येईल. नोंदणीसाठी शुल्क मागितल्यास जिल्हा तसेच तहसील कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी केले.

Farmer ID
Agristack Yojana : पालघर जिल्ह्यातील गावागावांत ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यावर भर

महत्त्वपूर्ण योजना

अॅग्रीस्टॅक योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळण्यास मदत होईल; तसेच जमीन नोंदी आणि इतर कामांमध्ये सोयीस्कर होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, पीक विमा योजना आणि पीक कर्ज या सरकारी योजनांचा लाभ थेट मिळणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेती विषयक नोंदी डिजिटल पद्धतीने नोंदवून घेतल्या जाणार आहेत.

...अशी करा घरच्या घरी नोंदणी

शेतकऱ्यांनी मोबाइलवर https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर समोर नॅशनल इन्फॉरमेटिक सेंटर (एनआयसी) अर्थात अॅग्रिस्टॅक नोंदणीचे पेज उघडलेले दिसेल. त्यावर अकाउंट उघडून नंतर लॉगिन करावे. त्यानंतर आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट केल्यास नोंदणी यशस्वी म्हणून संदेश प्राप्त झाला की नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, अॅग्रिस्टॅक नोंदणी करण्यासाठी खातेदाराचा मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. कारण, त्याशिवाय नोंदणी करताना आवश्यक असलेला ओटीपी येत नाही.

अॅग्रिस्टॅक नोंदणीची स्थिती

तालुका खातेदार शेतकरी झालेली नोंदणी टक्के

भूम ५५५८३ २६२४० ४७.२१

धाराशिव ९०५२७ ४२०३६ ४६.४३

कळंब ६४७९१ ३००१० ४६.३२

लोहारा ३०७४० १२८४३ ४१.७८

उमरगा ५८७६१ २९०४३ ४९.४३

परंडा ५४४०३ २६०५७ ४७.९०

तुळजापूर ८८१५१ ३९२८९ ४४.५७

वाशी ३४०८८ १९०२६ ५५.८१

एकूण ४७७०४४ २२४५४४ ४७.७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com