Agriculture Pest Management : पैसा, वाणी, बहूपाद किडीचे व्यवस्थापन

Indian Farming : विदर्भातील मागील वर्षी पेरणीनंतर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिकावर बहूपाद किडींचा काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता.
Agriculture Pest
Agriculture PestAgrowon

डॉ. डी. बी. उंदीरवाडे

Agriculture Pest Control : विदर्भातील मागील वर्षी पेरणीनंतर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिकावर बहूपाद किडींचा काही प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यांना स्थानिक भाषेमध्ये पैसा, वाणी किंवा इंग्रजीमध्ये मिलिपिड्स या नावाने ओळखले जाते. याही वर्षी अनेक ठिकाणी अंकुरलेल्या बिया आणि अंकूर खाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या किडींची व्यवस्थित माहिती घेऊन नियंत्रणाचे उपाय वेळीच करण्याची आवश्यकता आहे.

पैसा किंवा वाणी ही एक निशाचर असून, सामान्यतः सडणारी पाने, काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती यावर उपजीविका करते. साधारणपणे निसर्गातील कुजलेल्या काडी कचऱ्याचे विघटन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र त्यांची संख्या वाढत चालली असून, या किडी आता नुकत्याच अंकुरलेल्या बिया आणि अंकुर यांची फडशा पाडत आहे. सामान्यतः रोपे जमिनीलगत कुरतडतात. कालांतराने रोपावर जाऊन पानेसुद्धा कुरतडतात. परिणामी, रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.

Agriculture Pest
Humani Pest Management : हुमणीच्या प्राैढ भुंगेऱ्याचे एकात्मिक व्यवस्थापन

जीवनक्रम

मिलिपिड्सच्या जीवनक्रमात अंडी, अळी व प्रौढ या तीन अवस्था असतात. एक मादी साधारणपणे ३०० च्या जवळपास अंडी घालते. अंडी जमिनीत काही इंच खोलीवर टाकली जातात. त्यानंतर अळी बाहेर पडते. त्यानंतर प्रौढ अवस्था ही प्रदीर्घ काळाची आहे. संपूर्ण जीवनक्रम हा पाच ते सात वर्षांत पूर्ण होतो. या किडीच्या वाढीसाठी जमिनीत आर्द्रता आवशक असते. पावसाळ्यात किंवा जिथे ओलिताची सोय आहे, अशा ठिकाणी ही कीड जास्त सक्रिय असते. हवामान अनुकूल नसल्यास ही कीड जमिनीत सुप्तावस्थेत राहते.

उपाययोजना

मिलिपीडचा (वाणी) प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खालील उपाय करावेत -

शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले घटक गोळा करून नष्ट करावेत. वाणी रात्री जास्त सक्रिय असते. रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत. सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत.

शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करावीत. बांधावरील गवत, दगड काढून बांध मोकळा ठेवावा. बऱ्याचदा घनदाट पिकात जास्त किंवा संध्याकाळी पाणी दिल्यामुळे प्रादुर्भाव वाढतो.

Agriculture Pest
Pest Management : उन्हाळ्यातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसांतच वाणी मरतात.

ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया केली आहे, तेथे प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.

जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होण्यासाठी पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी.

चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते.

रासायनिक नियंत्रण

वारंवार या किडींचा प्रादुर्भाव होत असलेल्या शेतामध्ये पेरणीपूर्वी कार्बोसल्फान (६ टक्के दाणेदार) किंवा क्लोरपायरिफॉस (१० टक्के दाणेदार) किंवा फिप्रोनिल (०.३ टक्का) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून १ हेक्टर शेतात पसरवल्यास फायदेशीर राहते. (याचे विद्यापीठाने केलेल्या प्रयोगामध्ये चांगले निष्कर्ष मिळाले आहेत. पण लेबल क्लेम नाही.)

पेरणी झाल्यावर रोप उगवल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरपायरिफॉस (२० ईसी) ३७.५ मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे पंपाचे नोझल ढिले करून रोपांभोवती वर्तुळाकार किंवा सरळ ओळीत ड्रेचिंग करावे. एक एकर क्षेत्रात ४० पंपांचे ड्रेचिंग करावे किंवा सायपरमेथ्रीन (५ टक्के एसपी) १.५ मिलि प्रति लीटर या उपाययोजना शक्यतोवर सायंकाळी कराव्यात.

(सदर कीडनाशकाला मिलिपीड (वाणी)साठी लेबल क्लेम नाही, मात्र कापूस पिकामध्ये आहे.)

डॉ. डी. बी. उंदीरवाडे, ९८५०८१९९९२

(विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com