
Onion Export Duty : राज्याच्या कृषिमंत्री पदाची जबाबदारी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कोकाटे यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला दुसऱ्यांदा कृषिमंत्री पद मिळालं आहे. राज्यातील शेतकरी मात्र विविध संकटांशी झगडत आहेत. त्यामुळे नवीन कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षाही आहेत. याबद्दल 'सकाळ'शी बोलताना कोकाटे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना अद्यापही २०२३ आणि २०२४ पीकविमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. यावर कृषिमंत्री कोकाटे म्हणाले, "अजून कृषी विभागाचा कार्यभारी स्वीकारलेला नाही. त्यामुळे आधी प्रश्न समजून घेईल. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रश्न सोडवेल. शेतकऱ्यांच्या कुठल्याही समस्या प्रलंबित राहणार नाहीत, अशी खात्री देतो." असा शब्दही कृषिमंत्र्यांनी दिला आहे.
कोकाटे म्हणाले, "सहकार क्षेत्रात मी अनेक वर्षे काम केलं आहे. त्याच्या अनुभव गाठीशी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत. कुठलाही प्रश्न कायमस्वरूपी कसा सुटेल, यादृष्टीने मी काम करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारची मदत घेईल." असे प्रतिपादन कोकाटे यांनी केले.
कांदा प्रश्नावरही तातडीने निर्णय घेण्यात येणार असून पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार आहे, असंही कोकाटे यांनी सकाळशी बोलताना सांगितलं. कोकाटे म्हणाले, "कृषिमंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यावर पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत चर्चा करणार असून वेळ पडली तर दिल्लीलाही जाईल पण कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यापासून कृषी विभागाकहा कारभार सुरू होईल, एवढं आत्ता सांगतो." अशी ग्वाही कोकाटे यांन दिली.
दरम्यान, राज्यातील सोयाबीन कापसाचे पडलेली दर, सोयाबीन कापूस खरेदीची प्रश्न, पिकविम्याचा सावळगोंधळ, कांद्यावरील निर्यात शुल्क, अतिवृष्टीची मदत, विविध योजनांची रखडलेली प्रक्रिया आदि समस्यांनी शेतकरी हैराण आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.