Agriculture Minister Kokate : कृषिमंत्री कोकाटे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाची रात्री पाहणी; तणनाशक कंपनीवर कारवाईचे निर्देश

Herbicide spraying : तणनाशक फवारणीमुळे जिल्ह्यातील मेशी (ता. देवळा) परिसरात शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याचे जवळपास शंभर एकर क्षेत्रावर पीक पूर्णत: नष्ट झालं. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी कृषिमंत्र्यांनी रात्री केली.
Agriculture Minister Kokate
Agriculture Minister KokateAgrowon
Published on
Updated on

Kanda Nuksan Bharpai : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रविवारी रात्री (ता.२६) नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. तणनाशक फवारणीमुळे जिल्ह्यातील मेशी (ता. देवळा) परिसरात शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याचे जवळपास शंभर एकर क्षेत्रावर पीक पूर्णत: नष्ट झालं. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी कृषिमंत्र्यांनी रात्री केली.

याबद्दलची माहिती कृषिमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे. पाहणी वेळी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर आणि शेतकरी उपस्थित होते. कळवण उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाले यांना तणनाशक औषधाचे सखोल परीक्षण करून पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश कोकाटे यांनी दिले आहेत.

कोकाटे यांनी फेसबुक पोस्टमध्ये या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच संबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देश कोकाटे यांनी दिली आहे. कोकाटे म्हणाले," इंडियन पेस्टीसाइड्स लिमिटेड कंपनीच्या ‘क्लोगोल्ड’ या तणनाशकामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी काल रात्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या गंभीर नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या कंपनीवर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मी दिले आहेत." असंही पाहणी नंतर कोकाटे यांनी लिहिलं आहे.

मेशी परिसरात तणनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी 'क्लोगोल्ड' तणनाशक फवारलं होतं. परंतु या फवारणीमुळे पूर्णत: पीक नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात कृषिमंत्री कोकाटे यांनी संबंधित कंपनीला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तणनाशकाचे नमुने खाजगी आणि सरकार प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

Agriculture Minister Kokate
Agriculture Machinery Subsidy : कृषी यंत्रासाठी थेट अनुदान, फळ उत्पादकांना वाहतूक खर्च देण्याचा विचार; कृषिमंत्री चौहान यांनी दिली माहिती

दरम्यान, शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा आपला संकल्प कायम असून योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि जबाबदार कंपनी यांच्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही देखील कृषिमंत्री कोकाटे यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com