Agriculture Cultivation : मशागतीची लगबग

Agriculture Update : यंदा मॉन्सूनचे आगमन वेळेत होत असल्याने तालुक्‍यात शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. सध्या धूळ पेरणीपूर्व नांगरणी बहुतेक ठिकाणी आटोपली आहे.
Agriculture
Agriculture Agrowon

Mumbai News : यंदा मॉन्सूनचे आगमन वेळेत होत असल्याने तालुक्‍यात शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळत आहे. सध्या धूळ पेरणीपूर्व नांगरणी बहुतेक ठिकाणी आटोपली आहे. बैलजोडीचा खर्च परवडत नसल्याने सर्रास ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी सुरू आहे.

मुरूड तालुक्यात भातशेतीची उत्पादकता चांगली आहे. भात लागवड क्षेत्र ३२०० हेक्टर असले तरी भात शेती परवडत नसल्याच्या सबबीखाली गेल्या अनेक वर्षांपासून २५ ते ३० टक्के जमीन पडीक असल्याचे चित्र आहे. धूळ पेरणीपासून भात काढणीचा खर्च एकरी १५ ते १६ हजार येतो. मात्र त्‍या प्रमाणात उत्पन्न होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

Agriculture
Agriculture Cultivation Rate : यंत्राद्वारे मशागतीचे दर वाढले

त्यातून जमीन धारणा क्षेत्र अगदी १० किंवा २० गुंठे असल्याने कसायला परवडत नसल्‍याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परिणामी भातशेती पडीक ठेवण्याकडे अत्यल्प भूधारकांचा कल दिसून येत आहे. भाताचे सुधारित वाण अनेक असले तरी उताऱ्याला चांगले म्हणून पारंपरिक ‘सुवर्णा’ हे वाण बहुतांश शेतकरी वापरताना दिसून येत आहे. शिवाय यंदा ११ जूनच्‍या दरम्‍यान पाऊस येणार असल्‍याने अनेक ठिकाणी भात शेतीच्‍या मशागतीचे कामे सुरू आहेत.

कृषी विभागाची मदत

भात लागवड क्षेत्र वाढीसाठी प्रत्येक गावामध्ये कृषी सहाय्यकांमार्फत बीजप्रक्रिया आणि उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना भात लागवडीच्या आधुनिक पद्धतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करून क्षेत्र वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच भात पिकाची शेतीशाळा राबविण्यात येणार आहे.

Agriculture
Cotton Cultivation : मॉन्सूनपूर्व कपाशी लागवडीसाठी बळीराजा सरसावला

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत भात पीक लागवडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. तसेच महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत कृषी अवजारे व यंत्रास अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. जेणेकरून वेळेची बचत होईल आणि जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली येईल, असे सांगण्यात येत आहे.

भात लागवडीसाठी सुधारित पद्धतीची प्रात्यक्षिके घेतली जातात. हेक्टरी नऊ हजार अनुदान स्वरूपात दिले जाते; परंतु तालुक्यात फक्त ३५ हजार हेक्टर क्षेत्रासाठीचे लक्ष्यांक आहे. त्यामध्ये दहा हेक्टर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व २५ हेक्टर आत्मा योजनेमधून दिले जाणार आहेत. तसेच मुरूड तालुक्यात १५ मे पासून ठिकठिकाणी भात बीजप्रक्रिया व उगवण क्षमता चाचणीची प्रशिक्षणे व प्रात्यक्षिके कृषी सहाय्यकांमार्फत सुरू आहेत.
मनीषा भुजबळ, तालुका कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com