Agriculture Cultivation Rate : यंत्राद्वारे मशागतीचे दर वाढले

Agriculture Technology : यांत्रिकीकरणाने शेतीची मशागत सोपी झाली खरी, परंतु अलीकडच्या काळात विविध यंत्रांच्या किमती वाढल्या. त्याला लागणारे डिझेल, पेट्रोलचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत.
Agriculture Cultivation
Agriculture CultivationAgrowon

Nagpur News : यांत्रिकीकरणाने शेतीची मशागत सोपी झाली खरी, परंतु अलीकडच्या काळात विविध यंत्रांच्या किमती वाढल्या. त्याला लागणारे डिझेल, पेट्रोलचे दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यातच शेतीचा वाढता खर्च, अवकाळी पाऊस, शेतशिवारात मजुरांचा दुष्काळ, गारपिटीसह शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

पूर्वी शेतकरी शेती मशागत बैलाच्या साह्याने करत असत. बैलाच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी अशा प्रकारची सर्व कामे करताना शेतकऱ्याला कुठलाही खर्च येत नव्हता. आधुनिक युगात शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाला असून बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. ट्रॅक्टरमुळे शेतीच्या कामानांही वेग आल्याने शेतीकरिता ट्रॅक्टर महत्त्वाचे साधन झाले आहे.

Agriculture Cultivation
Agriculture Inflation Formula : महागाई ठरवण्याचे सूत्र, शेतकऱ्यांना लुटीचे अस्त्र

त्यामुळे शेतातील बहुतांश कामे ही सध्या ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचे दर वाढले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अशा परिस्थितीत पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतकरी आता चिंतेत सापडला आहे. नांगरणी, वखरणी, पराटी काढण्याचे एकरी दर मागच्या वर्षीच्या तुलनेत २०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यात मजुरांचा प्रश्‍न चिंतेचा बनला असून, अधिकचे पैसे मोजूनही मजूर कामावर यायला तयार नसल्याने शेतकरी मेटाकुटीस येत आहेत.

Agriculture Cultivation
Agriculture Technology : पऱ्हाटी व्यवस्थापनासाठी श्रेडर!

मजूर कामावर येईना

गुमगाव परिसरातील कित्येक महिला तसेच पुरुष मजूर सध्या शेतात मजुरीला न जाता मिहान, एमपेरिअन सिटी, वृंदावन सिटी, सेझ, ऑरेंज सिटी लॉजिस्टिक हब, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल, संदेश सिटीमध्ये घरकाम, ऑफिसकाम, बागकाम, सुरक्षारक्षक आदी कामाला जाणे पसंत करतात. परिणामी गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, सुमठाणा, किरमटी, वडगाव गुजर, मेणखात, गोधनी, लाडगाव, शिवमडका, धानोली, कान्होली, सालईदाभा, दाताळा, खडका शिवारातील शेतकऱ्यांना सातगाव, बुटीबोरी गणेशपूर, आमगाव, एमआयडीसी परिसरांतून मजुरांना स्वखर्चाने चारचाकी वाहनाने शेतीकामांसाठी आणावे लागत आहे.

मशागतीसाठी एकरचे भाव

पराटी काढणी ८०० ते ९०० रुपये

पराटी जमा करणे ६०० ते ७०० रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com