Village Development Plan : जळगावच्या कृषी, ग्रामविकासाचा आराखडा सादर

IAS Ayush Prasad : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाबरोबर जिल्हा प्रशासनाने विकास आराखडा करण्यासाठी करार केला होता. तो विकास आराखडा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादर केला.
IAS Ayush Prasad
IAS Ayush Prasad Agrowon

Jalgaon News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत २०४७’ करण्याचा संकल्प केला आहे. या दृष्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर, २०३७ पर्यंत २.५ ट्रिलियन डॉलर व २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलर करण्याचे आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे.

या दृष्टीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाबरोबर जिल्हा प्रशासनाने विकास आराखडा करण्यासाठी करार केला होता. तो विकास आराखडा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादर केला. विद्यापीठाचे डॉ. अनिल डोंगरे, डॉ. राजेश जवळेकर, डॉ. उज्ज्वल पाटील, डॉ. आर. आर. चव्हाण, प्रा. मनोज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, सल्लागार शशी मराठे उपस्थित होते.

IAS Ayush Prasad
Village Water Plan : राज्यातील २०० गावांमध्ये ग्राम जलआराखडे करण्याचे उद्दिष्ट

अत्यंत सूक्ष्म अभ्यास

विद्यापीठासोबत ऑक्टोबरमध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. आराखडा तयार करत असताना विविध विभागातील शासकीय, निमशासकीय व खासगी भागधारकांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन चर्चा केली. त्या चर्चेत विकासासाठी आवश्यक कृषी व कृषी संलग्न उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

IAS Ayush Prasad
Action Plan : शेतकऱ्यांच्या समस्यांची उकल करणारा कृती आराखडा असावा

त्याचा आराखडा तयार करण्यात आला. या विकास आराखड्यात जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी विविध उपाय योजना सुचविण्यात आल्या आहेत. यात डिस्ट्रिक्ट एक्स्पोर्ट डॉक्युमेंटेशन सेल, जळगाव अलाइड इंडस्ट्री प्रमोशन सेल, या सारख्या उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊन विकासाकडे वाटचाल होईल. विकास आराखडा बनवताना विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तज्ज्ञ प्राध्यापकांनी या वेळी सांगितले.

...या गोष्टींवर द्यावा लागेल भर?

पायाभूत सुविधांचा विकास करणे

निर्यात वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक सोईसुविधा तयार करणे

वेळोवेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजार संशोधन, विश्‍लेषण करणे सरकारी संस्थांचे मिळणार सहकार्य

वाहतूकदारांसाठी आंतर जिल्हा नेटवर्क सुविधा केंद्राची निर्मिती

जळगाव संलग्न उद्योगांना प्रोत्साहन क्षेत्र निर्माण करणे

अन्न प्रक्रिया, जतन कक्ष (Storage) निर्माण करणे

प्रभावी पाणी व्यवस्थापन मृद व जलसंधारणासाठी पिकांचे फेरपालट / विविधीकरण

कृषी संबंधित सूक्ष्म व लघू उद्योगांना चालना देणे बाबत उपाययोजना

शेतीच्या यांत्रिकीकरणावर भर

माती, पाणी आणि अन्न चाचणी सुविधा निर्माण करणे

पशुसंवर्धनात गुणवत्ता पूर्ण वाढ

शेती व्यवसाय शाश्‍वत करण्यासाठी प्रयत्न

जळगाव जिल्हा निर्यात वृद्धी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com