Crop Advisory : खरीप पीक सल्ला

Kharif Season Crops : . कीड-रोग नियंत्रणासाठी करण्यात येणारी रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांची फवारणी अधिक प्रभावी होण्याकरिता फवारणी द्रावणात स्टीकर (चिकटणारा पदार्थ) आणि स्प्रेडर मिसळून फवारणी करावी.
Crop Advisory
Crop AdvisoryAgrowon
Published on
Updated on

Crop Management : सद्यःस्थितीत ढगाळ हवामान, पाऊस अशा हवामान स्थितीमुळे तापमानात घट आणि आर्द्रतेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा हवामान स्थितीमध्ये पिकांवर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होण्यास पोषक वातावरण तयार होते. कीड-रोग नियंत्रणासाठी करण्यात येणारी रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांची फवारणी अधिक प्रभावी होण्याकरिता फवारणी द्रावणात स्टीकर (चिकटणारा पदार्थ) आणि स्प्रेडर मिसळून फवारणी करावी. पावसाची तीव्रता पाहून चार ते पाच तास पावसाची उघडीप असताना फवारणी घ्यावी.

आंबा

वाढीची अवस्था

दमट हवामान आणि ढगाळ वातावरण यामुळे दाट पालवी असलेल्या आंब्याच्या झाडावर बुरशीजन्य फांदेमर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. रोगाच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भित फांद्या प्रादुर्भित भागाच्या २ ते ३ इंच खाली कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या भागाला बोर्डोपेस्ट लावावी. पावसाची उघडीप असताना १ टक्के बोर्डो मिश्रण खोड व फांद्या व्यवस्थित भिजतील अशाप्रकारे फवारणी करावी. आंबा बागेतील गवत काढून बागेची साफसफाई करावी.

Crop Advisory
Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

खरीप भात

फुटवे अवस्था (निम गरव्या आणि गरव्या जाती)

पोटरी अवस्था (हळव्या जाती)

भात खाचरात पाणी साठवण्यासाठी बांधबंदिस्ती करून पाणी बांधून ठेवावे. पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. आवश्यकतेनुसार बाह्य स्रोतांतून पाणी देण्याची व्यवस्था करावी.

हळवे भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा ४३५ ग्रॅम युरिया प्रति गुंठा प्रमाणे पावसाची तीव्रता कमी असताना द्यावी.

भात पिकावर सुरळीतील अळी, खोडकीड, तपकिरी तुडतुडे आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पिकाचे किडीच्या प्रादुर्भावाकडे सातत्याने निरीक्षण करावे.

Crop Advisory
Crop Advisory : भात, नागली, काजू, आंबा पिकासाठी कृषी सल्ला (कोकण विभाग)

वेलवर्गीय पिके

फुलोरा ते फळधारणा अवस्था

वेलवर्गीय भाजीपाला फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये ‘क्यू ल्यूर’ रक्षक सापळे एकरी २ या प्रमाणे लावावेत. सापळे मंडपात जमिनीपासून १ ते २ फूट उंचीवर राहतील अशाप्रकारे टांगावेत.

कारली, पडवळ, दुधीभोपळा, दोडका

वेलवर्गीय भाजीपाला पिकावर तांबडे भुंगे, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीत घटकांची फवारणी करावी.

मिरची, वांगी, टोमॅटो

फुलोरा ते फळधारणा

ढगाळ वातावरण संभवत असल्याने वांगी, मिरची, टोमेटो पिकावर तुडतुडे, पांढरी माशी व मावा या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पिकाचे वेळोवेळी निरिक्षण करून आवश्यकतेनुसार पावसाची किमान ४ ते ५ तास उघडीप असताना फवारणीचे नियोजन करावे.

वांगी पिकावर शेंडा व फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. ही अळी फांद्यांना आतील बाजूला इजा करते. त्यामुळे फांद्या सुकतात. यासाठी रोपांचे सातत्याने निरीक्षण करावे. कीडग्रस्त फांद्या खुडून नष्ट कराव्यात.

(०२३५८) २८२३८७ / ८१४९४६७४०१

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com