SRT Farmer Honor Ceremony
SRT Farmer Honor CeremonyAgrowon

SRT Farming: कृषी विद्यापीठांनी ‘एसआरटी’चे प्रयोग घ्यावेत

Agriculture Commissioner Suraj Mandhare: एसआरटी ही पीक उत्पादन वाढ आणि जमीन सुपीकता वाढवणारी पद्धती आहे. कृषी विभागातर्फे एसआरटी पद्धतीने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रयोगांची आम्ही नोंद घेतली आहे.
Published on

Raigad News: एसआरटी ही पीक उत्पादन वाढ आणि जमीन सुपीकता वाढवणारी पद्धती आहे. कृषी विभागातर्फे एसआरटी पद्धतीने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रयोगांची आम्ही नोंद घेतली आहे. या पीक पद्धतीचा अधिक अभ्यास होण्यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांना त्यांच्या प्रक्षेत्रावर एसआरटी पद्धतीने पीक लागवडीचे प्रयोग घेण्यासाठी मी सूचना केल्या आहेत. यातून एसआरटी पीक लागवड पद्धतीचे धोरण तयार होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.

सगुणाबाग, मालेगाव (नेरळ) येथे एसआरटी शेतकऱ्यांचा कृषिसन्मान सोहळा नुकताच (ता. २२) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कृषी आयुक्त सूरज मांढरे, अभिनेते मकरंद अनासपुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात एसआरटी पद्धतीने शेती करणाऱ्या चाळीस शेतकऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये दोन शेतकरी गुजरात आणि कर्नाटक राज्यांतील होते. या कार्यक्रमाला राज्यभरातील प्रयोगशील शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

SRT Farmer Honor Ceremony
SRT Technique : ‘एसआरटी कृषी रोबोट’ करणार तंत्रज्ञान प्रसार

या वेळी मार्गदर्शन करताना श्री. मांढरे म्हणाले, की पीक उत्पादन घेताना जमीन सुपीकता आणि अन्नधान्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे. प्रत्यक्ष शेतीमधील समस्या लक्षात घेऊन खर्च कमी करणारे शाश्वत तंत्रज्ञान कृषी विद्यापीठांनी विकसित करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शेती व्यवस्थापनात आले आहे, या तंत्रज्ञानाची साथ महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने कृषी विद्यापीठांनी त्यांचा अभ्यासक्रम आणि संशोधनात आमूलाग्र बदल करावेत, तरच जागतिक स्पर्धेला आपला शेतकरी तोंड देऊ शकेल.

SRT Farmer Honor Ceremony
Paddy SRT Technology : आदिवासी भागात रुजतेय ‘एसआरटी’ तंत्रज्ञान

अभिनेते अनासपुरे म्हणाले, की शाश्वत शेतीसाठी जल, मृदा संधारण महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या सहकार्यातूनच शेतीचा विकास होणार आहे. एसआरटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारंपरिक शेती तंत्रज्ञान आणि विज्ञानाची सांगड घातली गेली. अशी शेती करणाऱ्यांचे अनुभव दिशादर्शक आहेत. शेती विकसित करायची असेल तर महिलांना सक्षम करणे आवश्यक आहे. शाश्वत शेतीच्या दिशेने जाताना आर्थिक साक्षरतादेखील आवश्‍यक आहे.

एसआरटी तंत्रज्ञानाच्या प्रसाराबाबत कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे म्हणाले, की हे तंत्र जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब वाढविणारे आहे. बियाणे, खते, पाणी, पैशांची बचत करणारे आहे. या तंत्रज्ञानाने शेत व्यवस्थापनात बदल होत आहेत. अनुराधा भडसावळे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com