Latur Agriculture Department
Latur Agriculture Departmentagrowon

Latur Agriculture Department : लातूर येथे कृषी सहायक संघटनेचे धरणे

Agriculture Department : १५ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर बुधवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे.
Published on

Latur Farmers : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर विविध मागण्यांसाठी कृषी सहायकांनी काम बंद आंदोलन हाती घेतले असून या आंदोलना दरम्यान लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यातील कृषी सहायकांनी बुधवारी (ता. २१) येथील कृषी सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

कृषी सहायक कालावधी रद्द करुन कृषी सहायकांना नियमित नियुक्ती देण्यात यावी, पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करावे, डिजिटल कामासाठी लॅपटॉप द्यावा, गाव पातळीवर कामासाठी मदतनीस द्यावा, निविष्ठा वाटपासाठी वाहतूक भाडे द्यावे, आकृतिबंधाला तातडीने मंजुरी देऊन त्यात कृषी पर्यवेक्षकांच्या पदात वाढ करुन कृषी सहायकांनी पदोन्नती द्यावी, आदींसह विविध मागण्यांसाठी कृषी सहायकांनी काही दिवसापासून टप्प्याटप्प्याने आंदोलन हाती घेतले आहे.

काळ्या फिती लावून काम करणे, सर्व शासकीय वॉटसप ग्रुपमधून बाहेर पडणे, एक दिवस सामुहिक रजेसह तालुका व जिल्हा पातळीवरील धरणे आंदोलानंतर कृषी सहायकांनी नऊ मेपासून ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर १५ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर बुधवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे.

Latur Agriculture Department
Seed Shortage Latur : खरिपाच्या तोंडावर डीएपी,सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

आंदोलनातूनच कृषी सहायक संघटनांच्या वतीने जिल्हा व विभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. कृषी पर्यवेक्षक तसेच मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे जिल्हाध्यक्ष ओंकार माने यांनी सांगितले. दरम्यान बुधवारी आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत कृषी सहायकांच्या मागण्यांबाबत निर्णय होईल, अशी आशा असल्याचेही त्यांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान आंदोलनामुळे ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. विविध योजनांच्या लाभासह शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व अन्य मार्गदर्शनासाठी कृषी सहायक उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. बुधवारच्या कृषी सहसंचालक कार्यालयासमोरील आंदोलनात कृषी सहायक संघटनेचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष शंकर पवार व सचिव दिलीप काकडे, लातूरचे ओंकार माने, शरद धनेगावे, हिंगोलीचे संतोष वाघमारे व श्रीनिवास शिंदे, परभणीचे संदीप शेळके व बबन राठोड तर धाराशिवचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कृषी सहायक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com