Agricultural Sankalp Abhiyan
Agricultural Sankalp Abhiyanagrowon

Agricultural Sankalp Abhiyan : वाशीम जिल्ह्यात २९ मेपासून ‘कृषी संकल्प अभियान’

Washim Agriculture News : भारतीय कृषी संशोधन परीषदेद्वारे विकसित ‘कृषी संकल्प अभियान’ २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत देशभरात राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
Published on

Washim : भारतीय कृषी संशोधन परीषदेद्वारे विकसित ‘कृषी संकल्प अभियान’ २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत देशभरात राबविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात या काळात हे अभियान राबवले जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

या अभियानामध्ये १ ते १.५ कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात येणार असून, या अभियानाचे उद्दिष्ट खरीप हंगामातील पिकांसंबंधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, विविध सरकारी योजना व धोरणांविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, पिकांची निवड, मृदा आरोग्य पत्रिकांची माहिती, नैसर्गिक शेती व संतुलित खतांचा वापर यावर मार्गदर्शन होणार आहे. या व्यतिरिक्त संशोधन केंद्रातील शिफारशीत तंत्रज्ञान शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार आहेत.

Agricultural Sankalp Abhiyan
Panand Road Cleared Washim : वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समन्वयातून पाणंद रस्ता मोकळा

या अभियानासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अधिनस्थ राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील तसेच आत्मा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वाशीम जिल्ह्यातील गावांची निवड करून कृषी जागृकता रथाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

वाशीम जिल्ह्यात दोन टीम तयार करण्यात आल्या असून प्रत्येक टीम दिवसातून तीन बैठका अनुक्रमे सकाळी ८ वाजता, १० वाजता व संध्याकाळी ६ वाजता घेईल. दररोज एका तालुक्यातील तीन गावांमध्ये कृषी जागृकता रथाद्वारे मार्गदर्शन शिबिर घेणार आहेत. अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यातील पंधरा गावांची निवड करून जिल्ह्यातील ९० ते १२० गावांमध्ये किमान २० ते २५ हजार शेतकऱ्यांपर्यंत खरीप मोहिमेतून तंत्रज्ञान प्रसार होणार आहे.

खरीप मोहिमेसाठी निवडलेल्या गावांची यादी, गावनिहाय वेळापत्रक व संबंधित नोडल अधिकाऱ्यांचे नावासह कृषी विज्ञान केंद्राच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. गावस्तरावर शेतकऱ्यांच्या अधिक सहभागासाठी सरपंच, कृषी सखी, पोलिस पाटील व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधींचे सहकार्य घेण्यात येईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विकसित कृषी संकल्प अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करडा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com