Panand Road Cleared Washim : वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समन्वयातून पाणंद रस्ता मोकळा

Washim Revenue Department : तहसीलदार तेजनकर यांनी महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि संबंधित शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडून आणल्याने हा १५ फुटांचा रस्ता मोकळा करण्यात आला.
Panand Road Cleared Washim
Panand Road Cleared Washimagrowon
Published on
Updated on

Panand Road Washim : केनवड, जि. वाशीम महसूल यंत्रणेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांमध्ये समन्वय घटवून आणत रिसोड तालुक्यातील मौजे केनवड ते गोहगाव हा पाणंद रस्ता मोकळा करण्यात आला.

या रस्त्याबाबत रिसोड महसूल प्रशासनाकडे २ मे रोजी तक्रार करण्यात आली होती. रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी तक्रारीची दखल घेत हा रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या होत्या. केनवड ते गोहगाव हा रस्ता मोकळा करणे गरजेचे असून या रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल व्हायचे.

Panand Road Cleared Washim
Washim Development : गुणवत्तापूर्ण काम आणि निधीचा पारदर्शक वापर करा

विशेष म्हणजे हा नऊ फुटांचा पाणंद रस्ता असून परिसरातील काही शेतकऱ्यांनी या रस्त्यात अडथळा आणला होता. त्यामुळे समोरील भागात जाताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. हे पाहता तहसीलदार तेजनकर यांनी महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि संबंधित शेतकऱ्यांमध्ये समन्वय घडून आणल्याने हा १५ फुटांचा रस्ता मोकळा करण्यात आला.

या वेळी तहसीलदार तेजनकर यांच्या नेतृत्वात मंडल अधिकारी संजय मोहळे, ग्राम महसूल अधिकारी पीयूष तायडे, तलाठी मनोज केनवडकर, महसूल सेवक यांच्यासह प्रवीण गोळे, कुंडलिक गोळे, मंगेश गोळे, पंढरी वैद्य, दामोदर गोळे, नितीन खराटे, नीलेश गोळे, रामदास सातपुते, सुरेश आढाव, योगेश गोळे, गोविंद वैद्य, विष्णू खराटे, किशोर खराटे, गजानन गोळे, पांडुरंग चवरे, योगेश आढाव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा रस्ता मोकळ्या झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यामुळे शेतकऱ्यांना मालवाहतूक सोयीची होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com