Agriculture Exhibition : सिंदखेडराजा येथे जानेवारीत कृषी प्रदर्शन

Latest Agriculture News : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव साजरा होत आहे.
Agricultural Exhibition
Agricultural ExhibitionAgrowon

Buldana News : जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक सुनील शेळके यांनी दिली.

जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने १२ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आधुनिक शेती कशी करावी, कृषी क्षेत्रातील आधुनिक अवजारांची माहिती जाणून घेता येणार आहे. सिंदखेड राजा येथे पहिल्यांदाच असे प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याची माहिती शेळके यांनी दिली.

Agricultural Exhibition
Agriculture Exhibition : नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद कृषी विभाग, रेशिम व मधुमक्षिका उद्योग, सहकार विभाग, पणन विभाग, कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रदर्शनात शासकीय सहभाग असणार आहे.

Agricultural Exhibition
Agricultural Exhibition : कोल्हापुरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन; वारणा उद्योग समुहाची माहिती

या प्रदर्शताला विदर्भ, मराठवाड्यातील जवळपास दोन ते तीन लाख शेतकरी सहभागी होतील असे नियोजन करण्यात आल्याचेही शेळके म्हणाले.

प्रदर्शनात काय असेल?

दररोज नवनवीन विषयावर व्याख्यान, कार्यशाळा, शेतकऱ्यांचे सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय बागवान मंडळाच्या विविध योजनांची माहिती, खते, बी, बियाणे, पाणी व्यवस्थापन, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री उद्योग, फळ बागा, कृषी अर्थसहाय्य, अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, आधुनिक फवारणी यंत्रे, कृषी माल वाहतूक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com