Agricultural Exhibition : कोल्हापुरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन; वारणा उद्योग समुहाची माहिती

Warana Vinay Kore : वारणा विभाग शेतीपूरक व शेती प्रशिक्षण संस्था व उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने कृषी औद्योगिक व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन होणार आहे.
Agricultural Exhibition
Agricultural Exhibitionagrowon

Agricultural Exhibition Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील वारणा सहकारी विविध उद्योग शिक्षण समूहातर्फे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे स्मृती महोत्सवानिमित्त ९ ते १३ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित केल्याची माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

वारणा विभाग शेतीपूरक व शेती प्रशिक्षण संस्था व उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने कृषी औद्योगिक व गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन होणार आहे.

यावेळी आमदार विनय कोरे म्हणाले की, 'शेती आणि अनुषांगिक व्यवस्थापनासाठी होणारे प्रदर्शन व धान्य महोत्सव राज्याला दिशादर्शक असेल. रसायनविरहित शेती, पाणी, माती, बियाणे यांच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन प्रदर्शनातून केले जाईल. यावेळी शेतकरी नवरा पाहिजे व ऊस पीक व्यवस्थापन या विषयांवरही परिसंवाद होणार आहेत. प्रदर्शनात अत्यंत माफक दरात स्टॉल उपलब्ध असतील.

कृषी प्रदर्शनात या गोष्टी पहायला मिळतील

म्हैस पळवणे स्पर्धा, डॉग शो, रिव्हर्स ट्रॅक्टर्स स्पर्धा, मोटारसायकल सुशोभीकरण स्पर्धाही होतील. देशाच्या कानाकोप-यातील २५१ प्रकारचे तांदूळ, ५१ प्रकारचे गहू, १८ प्रकारची बाजरी, ज्वारी, कडधान्ये पाहण्यास व विक्रीस उपलब्ध असतील.

नॉर्थ अमेरिका, युरोप, मेक्सिको, न्यूझीलंड, जपान, तैवान, मिडल ईस्ट या देशांतील फळे, भाजीपाला विक्रीसाठी तसेच खाद्यसंस्कृती जोपासणारे स्टॉल असतील. लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती समन्वयक जीवनकुमार शिंदे, रूपेश कोळेकर यांनी दिली.

Agricultural Exhibition
Warana Milk : वारणा दूध संघातर्फे जातिवंत जनावरांचे प्रदर्शन, वारणा श्री किताबही मिळणार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com