Crop Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

Agriculture Update : राहुरी विभागातील कृषी सल्ल्याबाबतची माहिती या लेखातून पाहुयात.
American armyworm on corn
American armyworm on cornAgrowon

Crop Advisory Rahuri Division :

उन्हाळी भुईमूग

पेरणीनंतर नांग्या आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत.

१० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व २ खुरपण्या कराव्यात.

ज्वारी

दाणे भरण्याची अवस्थेमध्ये पीक असल्यास हुरड्याकरिता केलेल्या फुले मधुर वाणाचे दाणे मऊ व दुग्धावस्थेत असताना कणसाची काढणी करावी.

सर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात येते. या अवस्थेत पाणी दिल्यास कणसात दाणे भरण्यास मदत होते. कणसाचे वजन वाढून उत्पादनात वाढ होते. त्यामुळे सिंचनाची सोय असल्यास पाणी द्यावे. पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण करावे.

काही ठिकाणी ज्वारी पक्वतेच्या अवस्थेत असल्यास कणसांचे पक्ष्यांपासून संरक्षण करावे.

ज्वारीच्या दाण्याच्या टोकाजवळ काळा ठिपका दिसून आल्यास ज्वारीची काढणी करावी. ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. धान्यांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

गहू

अ) पीक शाकीय वाढीची अवस्था पिकास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी दुसरे पाणी देण्याची व्यवस्था करावी. बागायत वेळेवर पेरणी : पेरणीनंतर तीन आठवड्यांनी २४ किलो नत्र प्रति एकरी द्यावे. बागायत उशिरा पेरणी : पेरणीनंतर तीन आठवड्यांनी १६ किलो नत्र प्रति एकरी द्यावे.

ब) दाणे भरण्याची अवस्था गहू पिकास पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसानंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत येते. या काळात वारा शांत असताना पाणी द्यावे. म्हणजे गहू पीक पडणार नाही. लिंबू वर्गीय पिके अनेक ठिकाणी सिट्रस सायला आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी थायामेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फळझाडांवर फवारणी करावी.

American armyworm on corn
Mango Advisory : आंबा सल्ला (कोकण विभाग)

ऊस

सुरू ऊस लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केल्यास ऊस उत्पादकता व साखरेचा उतारा चांगला मिळतो. आडसाली ऊस लागवडीसाठी को. ८६०३२ (नीरा) किंवा को.एम. ०२६५ (फुले २६५) या जातींची निवड करावी.

एक डोळा रोपांपासून (३० ते ४५ दिवस वयाच्या रोपांची) ऊस लागवड करावी त्यामुळे नेहमीच्या तुलनेत ऊस लागवडीस ३० ते ४५ दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तण नियंत्रण, खते, देखरेख यांची बचत होते. बेण्याद्वारे लागवड करावयाची असल्यास बेणे मळ्यात वाढविलेले ९ ते १० महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि आनुवंशिकदृष्ट्या शुद्ध ऊस बेणे वापरावे.

American armyworm on corn
Crop Advisory : कृषी सल्‍ला (मराठवाडा विभाग)

मका

कणसे सुटताना किंवा दाणे भरताना पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून येत आहे. अळीचा प्रादुर्भाव लक्षात येण्यासाठी प्रति एकरी चार कामगंध सापळे लावावेत.

प्रादुर्भाव दिसत असल्यास अळीच्या वाढीच्या सुरुवातीला (एक ते तीन अवस्था) अवस्थांमध्ये निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरेक्टीन (१००० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

अधिक प्रादुर्भाव असल्यास, इमामेक्टीन बेन्झोएट ०.४ मि.लि. प्रति लिटर पाण्यातून फवारावे.

पूर्वहंगामी ऊस पिकामध्ये १२ ते १६ आठवडे झाले असल्यास नत्राचा तिसरा हप्ता द्यावा. यासाठी हेक्टरी ३४ किलो नत्र (७५ किलो युरिया) वापरावा. नत्रयुक्त खताबरोबर मिसळून ६:१ या प्रमाणात निंबोळी पेंडीची भुकटी दिल्यास नत्र पिकाला दीर्घकाळ लागू पडते.

वांगी

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायफेन्थ्युरॉन (४७.८ एससी) १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे पिकावर फवारणी करावी.

भाजीपाला

मावा, फुलकिडे आणि तुडतुडे यांसारख्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

या किडीच्या रासायनिक नियंत्रणासाठी, ॲसीफेट (७५ एसपी) १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी पाणी या प्रमाणे पिकावर फवारणी करावी.

: ०२४२६ -२३४२३९

(प्रमुख अन्वेषक, ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com