Agri Expo
Agri ExpoAgrowon

Agri Expo 2025 : ‘अॅग्रिकोन न्यूट्रिटेक’चे ‘लेवलअप’ ठरतेय आकर्षण

Agricon Nutritech's : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्सो-२०२५’ कृषी प्रदर्शनामध्ये मुख्य प्रायोजक असलेल्या ‘अॅग्रिकोन न्यूट्रिटेक’ची विविध उत्पादने मांडण्यात आली आहेत.
Published on

Chhatrapati Sambhajinagar News : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या ‘अॅग्री एक्सो-२०२५’ कृषी प्रदर्शनामध्ये मुख्य प्रायोजक असलेल्या ‘अॅग्रिकोन न्यूट्रिटेक’ची विविध उत्पादने मांडण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या अन्नद्रव्यांचे एकाच किटमध्ये अनेक फायदे देणारे ‘लेवलअप’ हे संपूर्ण पीकपोषक कीट शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरले आहे.

कृषी प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारालाच ‘अॅग्रिकोन न्यूट्रिटेक’चे दालन उभारण्यात आले आहे. या दालनावर लिक्विड, फर्टिलायझर, वॉटर सोल्युबल अशा स्वरूपातील विविध प्रकारच्या खत श्रेणींचा समावेश आहे. लेवलअप हे वैशिष्ट्यपूर्ण असणारे खत पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने बनवलेले आहे.

Agri Expo
Agri Expo 2025 : छत्रपती संभाजीनगरला शुक्रवारपासून ‘अॅग्री एक्स्पो-२५’

जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे, पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरुन काढणे, पिकाच्या वाढीच्या संप्रेरकांना आणि एन्झाईम सिस्टिमला मदत करणे अशी त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. खताच्या सर्व श्रेणी कंपनीने ‘अॅग्रिसील’ या ब्रॅण्डखाली सादर केल्या आहेत. पिकांना फवारणीसाठी आणि ड्रीपमधून वापरता येणारी ही विविध प्रकारची खते आहेत. फळांचा आकार वाढवणे, एकसमान वाढ करणे आणि चमक वाढवण्यास उपयुक्त ठरणारी,

Agri Expo
Agri Expo 2025 : अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

फळांच्या उत्पादन, गुणवत्तेसाठी कंपनीची सर्व खत उत्पादने फायदेशीर आहेत. वॉटर सोल्युबल खतेही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत. या खतांचे वैशिष्ट्य म्हणजे क्लोरीन मुक्त, ईसी कमी, क्षारपड, चोपण किंवा जास्त पीएच असलेल्या जमिनीस ती उपयुक्त ठरतात.

त्याशिवाय पिकाच्या वाढीला अवघ्या तीनच दिवसांत ती प्रतिसाद देतात. याबाबत कंपनीचे स्टेट हेड कृष्णा साळवे आणि एरिया सेल्स मॅनेजर सुदर्शन राऊत म्हणाले, की आमच्या उत्पादनाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस ती पडत आहेत. त्यामुळेच आमच्या उत्पादनांना मागणी वाढते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com