Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

APMC Market Update : पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करताना प्रचलीत पद्धतीने कामात सहभागी करून न घेतल्याने मापारी-माथाडी कामगारांमध्ये उद्रेक झाला.
Worker Agitation
Worker AgitationAgrowon

Niphad News : पिंपळगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करताना प्रचलीत पद्धतीने कामात सहभागी करून न घेतल्याने मापारी-माथाडी कामगारांमध्ये उद्रेक झाला. कामगारांनी सोमवारी (ता. २९) पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर प्रांगणात लाकडाचे सरण रचून आंदोलन छेडले.

लेव्ही आमच्या हक्काची...अशा जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे बाजार समितीमधील व्यापारी व कामगार यांच्यातील लेव्हीवरून सुरू असलेल्या वाद आता अधिक टोकदार झाला आहे. कामावर न घेतल्यास कांदा लिलाव बंद पाडण्याचा इशारा कामगारांनी दिला

Worker Agitation
Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

लेव्हीच्या वादावरून व्यापारी व कामगार यांच्यात महिनाभरापासून संघर्ष पेटला आहे. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीत महिनाभरापासून कांद्याचे लिलाव ठप्प आहेत. कांदा लिलाव सुरू करण्यात आले. त्यात बाजार समिती प्रशासनाने मापारी, माथाडी कामगारांना कामकाजात समाविष्ट करून घेतले नाही.

यावरून कामगार घटक संतप्त झाले. तीनशेहून अधिक कामगार पिपळगाव बाजार समितीच्या प्रांगणात लाकडी सरण रचून आंदोलन छेडले. महिला कामगारांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. कामकाजात सहभागी करून घ्या अन्यथा आत्महत्येचा इशारा दिला. कामगारांना डावलून बेकायदा कामकाज होत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

दरम्यान, आंदोलनास्थळी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांनी भेट देऊन कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कामगारांनी कामकाजात सहभागी करून घेण्यावर ठाम राहीले. नारायण पोटे, गणेश कुशारे, दीपक मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.

मंगळवारी कामकाजात समाविष्ट करून न घेतल्यास कांदा लिलाव बंद पाडले जातील, असा इशारा देण्यात आला. हक्काची कामे मिळालीच पाहीजे, मजुरी, लेव्ही आमच्या हक्काची’ अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

Worker Agitation
Onion Auction : हमाली, तोलाई, वाराई कपातीविना कांदा लिलाव सुरू
प्रचलित पद्धतीनुसार आम्ही काम करण्यास तयार आहोत. लेव्हीचा प्रश्‍न न्यायप्रविष्ठ असताना हकनाक त्यावरून व्यापाऱ्यांनी वाद उकरून काढला आहे. प्रचलित पद्धतीने कामगार काम करण्यासाठी तयार आहेत. पण बाजार समिती प्रशासनाने कामगारांना कामकाजात समाविष्ट करून घेतले नाही. आमची रोजीरोटी हिरवण्याचा प्रयत्न करीत एकतर्फी निर्णय घेतला.
नारायण पोटे, कामगार नेते
जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या कामकाजाप्रमाणे पिंपळगाव बाजार समितीत कामकाज सुरू आहे. कामगारांना न्याय मिळावा यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. व्यापारी व कामगारांच्या वादात शेतकरी भरडला जाऊ नये म्हणून बाजार समितीत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार दिलीप बनकर, सभापती-पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com