Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

Onion Market : केंद्र सरकारने कांदा निर्यात सुरू करणार असल्याची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे.
Onion Export Ban
Onion Export Banagrowon

Pune News : केंद्र सरकारने कांदा निर्यात सुरू करणार असल्याची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केला आहे. कांदा उत्पादकांची नाराजी दूर करून मते मिळवण्याचा हा मोदी सरकारचा कुटील डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गुजरातमधून पांढरा कांदा निर्यात करण्याच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक कमालीचे नाराज झाले होते. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होऊ नये म्हणून केंद्र सरकराने ९९ हजार १५० टन कांदा निर्यात करणार असल्याची खोटी माहिती प्रसारित केली, असे घनवट यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Onion Export Ban
Onion Export : कांदा निर्यातीस परवानगीची घोषणा फसवीच

प्रत्यक्षात एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत विविध देशांना निर्यात केलेल्या कांद्याची ही एकूण बेरीज आहे. नवीन कांदा निर्यातीबाबत कोणताही आदेश नाही. हा निर्यात होणारा कांदा शेतकऱ्यानंकडून खरेदी होत नाही. या निर्यातीसाठी टेंडर काढले जाते. तसेच एनसीईएलमार्फत निर्यात केला जात आहे.

पांढऱ्या कांद्याचा काळा बाजार

गुजरातमधील काही कांदा व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पांढरा कांदा खरेदी करून ठेवला होता. परंतू निर्यात बंदी असल्यामुळे हा कांदा निर्यात होऊ शकत नव्हता. केंद्र सरकारामध्ये सलोख्याचे संबंध असलेल्या काही व्यापाऱ्यांनी तोडपाणी करून निर्यातीची परवानगी मिळवली आणि परवानगीचे अध्यादेश मिळताच, एकाच दिवसात पूर्ण कांदा बोटीवर चढवून रवाना करण्यात आला.=

कांदा तस्करी जोरात

गुजरातमधील बंदरावरून मोठ्या प्रमाणात कांद्याची तस्करी सुरू असल्याचे ही बोलले जात आहे. १५ रुपये किलोने खरेदी केलेला कांदा फार तर २५ रुपये किलोप्रमाणे आखती देशात पोहोचतो. तेथे या कांद्याला ८० रुपयांच्या दरम्यान दर मिळत असल्याने तस्करांची मोठी कमाई होत आहे.

Onion Export Ban
Onion Export : कांदा निर्यात परवानगीवरून राजकारण तापले! शरद पवारांसह राऊत यांची मोदींवर घणाघाती टीका

निवडणूक जिंकण्यासाठी दिशाभूल

निर्यातबंदीमुळे कांद्याचे दर पडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक नाराज आहेत. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी दिशाभूल केली जात आहे. नवीन कांदा निर्यातीसाठी कोणताही आदेश पारित केलेला नाही. कांदा पट्ट्यात सध्या निवडणूक प्रचार सुरू होत आहे. मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी मोदी सरकारने प्रसार माध्यमांद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. ही शेतकऱ्यांची चक्क दिशाभूल आहे.

मतदान करताना विचार करावा

कांदा उत्पादकांच्या गरिबीला, कर्जाला व दुरावस्थेला मोदी सरकारचे निर्णय जबाबदार आहे. शेतकऱ्यांनी मतदान करताना याचा विचार करून मतदान करावे. शेतकरीविरोधी सरकारचा पराभव करणे आवश्यक आहे. कांदा उत्पादक सुद्धा सरकार पडू शकतो हे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचेही घनवट यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com