Maratha Reservation : आंदोलनाची वऱ्हाडातही धग वाढली

Manoj Jarange Patil Protest : राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला या विभागातील जिल्ह्यांमधूनही पाठिंबा वाढू लागला.
Maratha Reservation
Maratha Reservation Agrowon
Published on
Updated on

Akola News : राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. त्यांच्या आंदोलनाला या विभागातील जिल्ह्यांमधूनही पाठिंबा वाढू लागला. अकोल्यात मराठा समाजाने मंत्र्यांना जिल्हा तर आमदार, खासदारांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने हा निर्णय जाहीर करण्यात आला. गजानन हरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही सुरू केले आहे. येथे गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चाची रविवारी (ता.२९) बैठक झाली. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत चर्चा होऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय झाला.

Maratha Reservation
Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मराठवाड्यात १२ बस फोडल्या

त्यानुसार अकोला जिल्ह्यात मंत्र्यांना, तर आमदार, खासदार यांना गावात पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार करण्यात आला. याशिवाय आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात आली. त्यानुसार २ नोव्हेंबरला रोजी जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन मराठा समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. अकोला शहर, मूर्तिजापूर येथे हे आंदोलन केले जाईल.

या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी. जरांगे पाटील यांना धक्का लागल्यास संपूर्ण मराठा समाज पेटून उठेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, कृष्णा अंधारे, विनायकराव पवार, प्रदीप चोरे पाटील, सुशांत बोर्डे, केशव मानकर, संजय कृष्णराव देशमुख, दीपक अवताडे, सदानंद खारोडे उपस्थित होते.

Maratha Reservation
Maratha Reservation : राज्यभरात मराठा आंदोलनाचा उद्रेक!, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत वाढ

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ निर्भय बनो जन आंदोलनाचे जिल्हा संयोजक गजानन हरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. रविवारी (ता.२९) त्यांनी आंदोलन सुरू केले.

आंदोलनाला गरजवंत सकल मराठा आक्रोश मोर्चा अकोलाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यामध्ये डॉ. अभय पाटील, अशोकराव पटोकार, अनंत गावंडे, अविनाश नाकट, प्रदीप खाडे, सुनील जानोरकर, विजय बोरकर याशिवाय इतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनात रिसोड तालुक्यातील मोठेगाव व करडा ही गावे अग्रेसर बनलेली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाठिंबा व्यक्त होत आहे. संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे गावकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत पुढाऱ्यांना गावबंदी जाहीर केली आहे. तसेच शाळेचे विद्यार्थी सुद्धा आता शाळेत जाणार नसल्याचे जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com