Electricity Update : उरमोडी नदीवरील पाणी योजनेची वीजकपात

Electricity Issue : उरमोडी धरणापासून ते माजगाव (ता. सातारा)पर्यंतच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत नदी पात्रातून पाणी उपशासाठी आता आठ तासांऐवजी रोज फक्त चारच तास वीज मिळणार आहे.
Urmodi River
Urmodi RiverAgrowon

Satara News : उरमोडी धरणातील पाणीसाठा कमी होऊन केवळ १७ टक्केच पाणी उरल्याने टंचाईसदृश परिस्थिती उद्‍भवली आहे. त्यामुळे उरमोडी धरणापासून ते माजगाव (ता. सातारा)पर्यंतच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंत नदी पात्रातून पाणीउपशासाठी आता आठ तासांऐवजी रोज फक्त चारच तास वीज मिळणार आहे. ऐन उन्हाळ्यात अशी परिस्थिती आल्यामुळे शेतातील पिके हातची जाण्याच्या धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी निर्माण झाली आहे.

Urmodi River
MNREGA Scheme : ‘मनरेगा’च्या सिंचन विहिरींचे गाडे अडकलेलेच  

जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी उरमोडी हे प्रमुख धरण असून सातारा, माण, खटाव या तीन तालुक्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे धरण आहे. उरमोडी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९.९६ टीएमसी आहे. सध्या या धरणात अवघा १.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे सिंचन विभागासाठी मोठे जिकिरीचे होत आहे. यामुळे उरमोडी धरणाखालील परळी, अंबवडे(बु), सोनवडी, गजवडी, काळोशी, भोंदवडे, करंडी, उपळी, आरे, दरे, पोगरवाडी, जरेवाडी, अंबवडे, डबेवाडा, शहापूर, सोनगाव, शेळकेवाडी, डोळेगाव, शिवाजीनगर, वेचले, शेंद्रे, भरतगाव, आष्टे, पाडळी, नागठाणे, गणेशवाडी, बोरगाव, अपशिंगे,

Urmodi River
Electricity Issue : विजेच्या लपंडावामुळे शेतकरी चिंतेत

आंबेवाडी, माजगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांच्या वैयक्तिक उपसासिंचन व काही गावांच्या पेयजल योजनांना रोज फक्त चारच तास थ्री-फेज वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश कृष्णा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यानी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पुढील काळात जलसंपदा, महावितरण विरुद्घ शेतकरी जनता यांच्यामधील पाण्यासाठी संघर्ष निर्माण होणार आहे.

ताकदीने न भांडल्यामुळे शेतकऱ्यांवर रोज चार तास शेतीपंपांची वीजकपात केली जात आहे. धरणात शिल्लक राहिलेले पाणीसुद्धा पिण्याच्या नावाखाली पळवापळवी चालूच आहे ती तत्काळ बंद करण्यासाठी व शेती पंपाची वीज परत आठ तास मिळविण्यासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी राजकारणातील पक्षीय झेंडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गंभीर प्रश्‍नावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (ता. ५) सांयकाळी सहा वाजता नागठाणे येथे नागठाणे -सोनापूर रोड वर विकास सेवा सोसायटी समोर (वडाच्या झाडा शेजारी) उपस्थित राहावे.
राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com