Hirda Procurement : हिरडा खरेदीच्या ठोस निर्णयानंतर धरणे आंदोलनाची सांगता ; मंत्री अनिल पाटील यांच्यासोबत होणार बैठक

Kisan Sabha protest : हिरडा खरेदीच्या निर्णयानंतर नाशिक येथील किसान सभेचे धरणे आंदोलनाची सांगता
Kisan Sabha protest
Kisan Sabha protestAgrowon

Nashik News : आदिवासी विकास महामंडळाने बाळहिरडा खरेदी पूर्ववत करण्यासह नुकसानभरपाईच्या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे सोमवारी (ता. ९) बाळहिरडा उत्पादक शेतकऱ्यांनी आदिवासी विकास आयुक्तालयात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. ते मंगळवारी (ता. १०) जिल्हा रुग्णालयासमोर सुरू होते. अखेर आंदोलनाच्या माध्यमातून मागण्यांविषयी ठोस निर्णय झाल्याने बुधवारी (ता. ११) तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली.

Kisan Sabha protest
Bal Hirda : हिरडा उत्पादकांचे आंदोलन सुरूच

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या अखत्यारीत येणाऱ्या बाळहिरडा खरेदी व हमीभाव या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मात्र चक्रीवादळामुळे नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाईसंबंधी आदिवासी विकासमंत्री आणि मदत पुनर्वसनमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी बैठकीची तारीख मिळावी यासाठी आंदोलन सुरू होते. सरकार व प्रशासन आंदोलकांची मागणी गांभीर्याने घेत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता.

अखेर हिरडा नुकसानभरपाई विषयी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्यासोबत १९ ऑक्टोबर रोजी, मंत्रालय मुंबई येथे बैठक होणार असल्याचे डॉ. अजित नवले यांनी कळविले. बैठकीत हिरडा नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन मंत्री पाटील यांनी फोनवर किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले व डॉ. अमोल वाघमारे यांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com