Kisan Sabha : शेतकऱ्यांच्या मागण्यांना यश ; हिरडा खरेदीसंदर्भात बोलावली महत्त्वपूर्ण बैठक

शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने अकोले ते लोणी असा शेतकऱ्यांचा पायी मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
Akole Farmer March
Akole Farmer Marchagrowon
Published on
Updated on

Farmer March :शेतकरी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने अकोले ते लोणी असा शेतकऱ्यांचा पायी मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळी सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर किसान सभेच्या मागण्या मान्य करत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सरकारी हिरडा खरेदी संदर्भात ९ मे ला बैठक बोलाविण्यात आली आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली किसान सभेचे शिष्टमंडळ बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसदर्भात किसान सभेच्या नेतृत्त्वात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून लोणीच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा पायी मोर्चा प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर स्थगित करण्यात आला आहे

Akole Farmer March
Farmer March : अखेर अकोले ते लोणी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा स्थगित ; किसान सभेची घोषणा

महाराष्ट्रात आंबेगाव, जुन्नर, अकोले व इगतपुरी तालुक्यात प्राधान्याने हिरडा उत्पादन होते. आदिवासी शेतकऱ्यांचे हिरडा हे एकमात्र नगदी पीक आहे. वनोपज सदरात येणाऱ्या व मालकी जमिनीवरही घेतल्या जाणाऱ्या हिरडा उत्पादनामुळे आदिवासी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

सरकारी खरेदी सुरू झाल्यास भावाबाबत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना यामुळे लाभ होतो. मात्र सरकारने बाळ हिरडा खरेदी बंद केल्याने खाजगी व्यापारी हिरड्याचे भाव पाडतात व आदिवासींची लूटमार करतात. आदिवासी शेतकऱ्यांना या लुटमारीपासून संरक्षण मिळावे यासाठी सरकारी हिरडा खरेदी सुरू करण्याची नितांत गरज आहे.

अकोले ते लोणी पायी मोर्चामध्ये किसान सभेने हिरडा सरकारी खरेदीचा मुद्दा पूर्ण ताकदीने लावून धरला होता. पायी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिस्तरीय बैठकीत या प्रश्नांबाबत आदिवासी विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत व आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्याचे मान्य केले होते.

दिलेल्या आश्वासनानुसार दि. ९ मे रोजी ही बैठक होत असून किसान सभेच्या डॉ. अशोक ढवळे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले, डॉ. अमोल वाघमारेसह अकोले, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com