RTO Action : आरटीओच्या कारवाईनंतर शेतकऱ्याकडून लातूरमधील चौकातच सोयाबीनची उधळण

Soybean Farmer : सोयाबीनने भरलेल्या एका वाहनावर आरटीओच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर या शेतकऱ्याने ‘सोयाबीन घ्या फुकट...फुकट...’ असे म्हणत संताप व्यक्त केला.
Soybean
SoybeanAgrowon

Latur News : शेरा (ता. रेणापूर) येथून आलेल्या सोयाबीनने भरलेल्या एका वाहनावर आरटीओच्या पथकाने दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर या शेतकऱ्याने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातच सोयाबीनचे पोते ठेवत ‘सोयाबीन घ्या फुकट...फुकट...’ असे म्हणत संताप व्यक्त केला. इतकेच नव्हे तर त्याने आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांना आम्ही सोयाबीन आणायचे की नाही हे सांगा असा जवाब ही केला.

Soybean
Soybean, Onion Market : सरकारने शेतकऱ्यांचा `करेक्ट कर्यक्रम` कसा केला? सरकारच्या कोणत्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची वाट लागली?

या वर्षी खरीप पावसाअभावी गेले आहे. त्यात शेतकऱ्यांनी कसे बसे सोयाबीनचे पीक घेतले आहे. त्यातही उतारा कमी आला आहे. दिवाळीनंतर सोयाबीन येथील आडत बाजारात येवू लागले आहे. असेच माधव सोनवणे (रा. शेरा) यांनी वाहन (क्रमांक एमएच २४ एफ ९७६३) यामध्ये सोयाबीनचे पोते भरून येथे आणले होते.

Soybean
Soybean Rate : सोयाबीन उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत

येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात हे सोयाबीन विक्रीसाठी त्यांनी आणले होते. हे वाहन आरटीओच्या पथकाने अडवले. त्याला बारा हजार पाचशे रुपये दंड आकारला. यावर या सोनवणे यांनी संताप व्यक्त केला. सोयाबीनने भरलेले एक पोते घेवून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. यावेळी त्यांनी आरटीओचा निषेध केला.

या शेतकऱ्याचे वाहन पथकाने पकडले होते. या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा असे काहीच कागदपत्रे नव्हती. तसेच नंबर प्लेट देखील स्पष्ट नव्हती. त्यामुळे पथकाने त्यांना बारा हजार पाचशे रुपये दंडाची कारवाई केली होती. त्यांनी हा दंड भरलाही आहे. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले.
आशुतोष बारकूल, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com