Agrowon Podcast : कापूस, सोयाबीन, हरभऱ्याचा बाजार आज कसा राहीला?

Market Update : बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम होती. कापसाचे भाव ६ हजार ६०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते.
Soybean Cotton Rate
Soybean Cotton RateAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin : वर्षाच्या शेवटच्या दिवशी वायद्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव पडले. आंतरराष्ट्रीय बाजारातील निराशा कायम असल्याने सोयाबीन पुन्हा १३ डाॅलरपेक्षा कमी झाले. शुक्रवारी वायदे १२.९२ डाॅलरवर बंद झाले. तर सोयापेंड ३८६ डाॅलरवर बंद झाली. देशातील बाजारातही याचे काहीसे पडसाद दिसले.

प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी भाव २५ रुपयांनी कमी केले होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. सोयाबीन बाजारातील परिस्थिती पाहिल्यानंतर भावात पुढील दोन आठवडे १०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

कापूस वायद्यांमध्ये वर्षाच्या शेवटी बाजार स्थिर दिसला. देशातील वायदे १६० रुपयांनी वाढून ५६ हजार ३८० रुपये प्रतिखंडीवर बंद झाले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ८०.६० सेंट प्रतिपाऊंडवर टिकून होते. बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र कायम होती. कापसाचे भाव ६ हजार ६०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होते.

बाजारातील कापूस आवक १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान कायम होती. कापूस आवक जास्त असल्याचा दबावही दरावर दिसून येत आहे. कापसाची आवक आणखी एक ते दीड महिना कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Soybean Cotton Rate
Cotton Rate : विमा परतावे, कपाशीला पंधरा हजार रुपये दर द्या

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दिवसेंदिवस कमी होत आहेत. सरकारी धोरणांचा दबाव हरभरा बाजारावर कायम आहे. सरकारने भारत ब्रॅंडखाली हरभरा डाळ विक्री सुरु केली. नाफेड, एनसीसीएफ, तसेच इतर सहकारी संस्था आणि रिटेल विक्री आऊलेट्समधून हरभरा डाळ ६० रुपये किलोने विकली जात आहे.

त्यामुळे खुल्या बाजारातील भावावर त्याचा परिणाम दिसून आला. हरभरा भाव आता ४ हजार ८०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत. म्हणजेच हमीभाव ५ हजार ४४० रुपयांपेक्षाही अनेक बाजारात कमी भाव मिळत आहे. 

Soybean Cotton Rate
Soybean Rate : सोयाबीन उत्पादक भाववाढीच्या प्रतीक्षेत

बाजारात सध्या वांगीला चांगला भाव मिळत आहे. बाजारातील आवक कमी झाली मात्र वांगीला उठाव चांगला आहे. त्यामुळे वांगी भाव तेजीत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा ३० टक्क्यांनी कमी आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने वांगी पिकाला फटका बसला होता.

तसेच कमी पाण्यामुळे लागवडीही कमी होत्या. याचा परिणाम आता बाजारातील आवकेवर होत आहे. सध्या वांग्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. वांग्याचे भाव आणखी काही दिवस कायम राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून आहेत. खरिपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे. तर बाजरीला सध्या उठाव चांगला आहे.

परिणामी बाजारीचा भाव टिकून आहे. बाजरीला सरासरी २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. रब्बीतही बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाही. त्यामुळे पुढील काळातही बाजारीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com