Aslam Abdul Shanedivan
उत्तराखंडमधील नैनितालच्या जंगलात भीषण आग लागली असून ती चार दिवसांपासून धुमसत आहे
आता या आगीच्या ज्वाळा नैनितालमधील हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचल्या आहेत
यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस, लष्कराचे जवानांसह हवाई दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
विशेष म्हणजे हवाई दलाच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरमधून पाण्याची फवारणीही केली जात आहे
गढवाल विभागातील चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पौरी आणि टेहरी, डेहराडूनच्या जंगलात आग नियंत्रणाबाहेर जात आहे
अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान झाडांच्या फाद्यांचा वापर करत आहेत
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये ५७५ घटनांची नोंद झाली असून सुमारे ६९० हेक्टर जंगल जळून खाक