Jayant Patil Sangli : शेतकऱ्यांनंतर शासकीय कंत्राटदार आत्महत्या करतील; जयंत पाटलांची सरकारवर घाणाघाती टीका

Government Contractors : थकीत बिलावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर सांगली येथे एका कार्यक्रमादरम्यान बुधवार (ता.१२) घाणाघाती टीका केली.
Jayant Patil Sangli
Jayant Patil Sangliagrowon
Published on
Updated on

Government Maharashtra : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील बांधकाम विभागाकडील कॉन्ट्रॅक्टरांनी विविध जिल्ह्यात थकीत बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये जोरदार निदर्शने केली. मात्र, सरकारने यावर एकही शब्द काढला नसल्याने विरोधकांनी आवाज उठवण्यास सुरू केले आहे. थकीत बिलावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर सांगली येथे एका कार्यक्रमादरम्यान बुधवार (ता.१२) घाणाघाती टीका केली.

यावेळी जयंत पाटील यांनी मंचावर बसलेल्या भाजप नेत्यांकडे पाहत टीका केली. "मी सांगत होतो, लय कॉन्ट्रॅक्ट घेऊ नका, आता आमच्या पक्षाकडे कोणी कॉन्ट्रॅक्टर राहिले नाहीत, सगळे कॉन्ट्रॅक्टर सत्तारूढ पक्षाकडे गेले आहेत, अशी मिश्किल टोलेबाजी जयंत पाटलांनी केली.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, "बांधकाम खात्यात ६० ते ७० हजार कोटींची कामे राज्यात होत आहेत. त्यामुळे पैशाची जुळणी कशी करायची? हा प्रश्न आम्हाला पडायची गरज नाही. अर्थमंत्र्यांना पडेल, अशी टीका पाटील यांनी अजित पवारांवर केली. तर ३१ मार्च २०२५ अखेर १८ हजार कोटींची बिले न निघाल्यास कॉन्ट्रॅक्टरांची पंचाईत होईल. आम्हाला कॉन्ट्रॅक्टरांची बाजू मांडावी लागेल अन्यथा देशात शेतकरी आत्महत्या होत आहेत. कालांतराने कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या सुरू होतील". अशी भिती देखील आमदार जयंत पाटलांनी व्यक्त केली.

Jayant Patil Sangli
Raju Shetti : सात-बारा कोरा करण्याचे आश्‍वासन पूर्ण करा अन्यथा; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

लाडक्या बहिणींना आम्ही आधार देणार : जयंत पाटील

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. "आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊन काम करणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा राहणार आहे. आम्ही त्यांच्या मागे आहोत", अशी भूमिका जयंत पाटील यांनी जाहीर केली.

"लाडक्या बहिणींनी तुम्हाला मते दिली आहेत, त्यांना तुम्ही शब्द दिला आहे, त्यांनी मतं दिली आहेत, आता तुम्ही पैसे देणार नसाल तर देतानाच बघून द्यायचे होते, आम्ही घाई करा म्हणत होतो का ? अश्या शब्दात महायुतीला खोचक टीका जयंत पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला.

महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे राज्य अधिवेशन यवतमाळ येथे पार पडले. या अधिवेशनात बिलं थकल्यामुळे हे आंदोलन टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश भोजकर यांनी दिली.

ठेकेदारांची धावपळ

आर्थिक वर्ष संपण्यासाठी दीड महिन्यांचा अवधी असला तरी व्यवसायाचा ताळेबंद करताना गुंतवणूक आणि जमाखर्च मांडताना कंत्राटदारांची धावपळ उडणार आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार धास्तावला आहे. सध्या राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे कंत्राटदारांना नाहक त्रास करावा लागणार आहे. त्यामुळे महिनाभराच्या आत प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com