
Raju Shetti Vs Devendra Fadanvis : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करावी. यासाठी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वतीने १ जानेवारीला निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुणे येथे गुरूवारी(ता.२६) बैठक झाली, तिथे निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.
शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. डी.ए.पी. खताच्या दरात पुन्हा २५० रुपयांची वाढ झाली. कीटनाशके, तणनाशकांच्या किमतीत वाढ झालेली आहे. सरकार हमीभाव जाहीर करते. हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल विकावा लागत आहे." असे शेट्टी म्हणाले.
माजी खासदार शेट्टी म्हणाले "परिणामी पाच वर्षांत शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट झाले आहे. एका बाजूला केंद्र सरकार कार्पोरट कंपन्यांचे दहा लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत नाही. ते कर्ज राईट ऑफ करत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते. हे दुर्देवी आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत. राज्यात रामराज्य आल्याचे महायुतीचे नेते सांगत आहेत. सरकारने दिलेला शब्द पाळावा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी १ जानेवारीला जाऊन सरकराने दिलेल्या शब्दांची आठवण करून देतील." अशी माहिती शेट्टी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मी स्वतः याबाबत आठवण करून देणार आहे. त्यानंतरही सरकराने आमची दखल घेतलेली नाही, तर राज्यव्यापी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली जाईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.