Flower Market : दसऱ्यानंतर दिवाळीतही फुलांना मागणी वाढली

Flower Rate : बाजारात झेंडूसह सर्वच फलांच्या दरात सुधारणा झाली आहे. फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रतिकिलोस शंभर रुपयांचा दर मिळाला आहे.
Flower Market
Flower MarketAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : बाजारात झेंडूसह सर्वच फलांच्या दरात सुधारणा झाली आहे. फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रतिकिलोस शंभर रुपयांचा दर मिळाला आहे. त्यामुळे बाजारात दसऱ्यानंतर दिवाळीत फुलांचे दर वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र किरकोळ आणि ठोक दरात मोठा तफावतही दिसली.

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, चास, कामरगाव, तसेच पारनेर, संगमनेर, राहाता, राहुरी तालुक्यातील काही गावांत फुलांचे उत्पादन घेतले जाते. मध्यंतरी परतीच्या पावसानंतर जिल्हाभर झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यात झालेल्या पावसामुळे झेंडूच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Flower Market
Flower Market : लक्ष्मीपूूजन, पाडव्यामुळे झेंडू, शेवंतीला मागणी वाढली

यानंतरही सातत्याने वातावरणात बदलत होत गेले. त्यामुळे हातातोंडाशी आलेले फुलांचे पीक अक्षरशः वाया गेले. बाजारभावही नसल्याने फूल उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. सध्या झेंडूच्या फुलांचे बाजारभाव वाढल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच आता दिवाळी सण सुरू झाला असल्याने फुलांचे बाजारभाव चांगलेच वाढले आहेत.

Flower Market
Flower Market : सणांमुळे झेंडूची मागणी वाढली; दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपये

लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडव्यानिमित्त झेंडूचे फुले शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरातील सर्वच गावांत झेंडूसह अन्य फुले विक्रीसाठी आणली होती. झेंडूचा सरासरी दर शंभर रुपये किलो दराप्रमाणे नागरिक फुले खरेदी करीत होते. मध्यंतरी झालेला पाऊस त्यानंतर वातावरणात सातत्याने होणारे बदल त्यामुळे झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली, असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, प्रतिकिलोस १०० रुपयांचा बाजारभाव मिळत आहे. लक्ष्मीपूजन असल्याने त्यामुळे फुलांचे भाव आणखी वाढले असल्याचे फूल उत्पादक शेतकरी सांगत आहे. असे असले तरी ठोक आणि किरकोळ विक्रीच्या दरात मात्र बरीच तफावत होती.

फुलांचे भाव (प्रती क्विंटल)

गुलाब ३००० ते २८०००

गुलछडी १३५०० ते ४००००

झेंडु ३००० ते १००००

गलांडा ५००० ते १५०००

पासली १५००० ते २५०००

शेवंती ८००० ते २५०००

ऑस्टर ९००० ते ४००००

गजरे ८०००० ते १०००००

जरबेरा ८००० ते २४०००

लिली ७५०० ते १५०००

तुळजापुरी ४००० ते १००००

स्प्रिंगर १०००० ते २००००

कामिनी ५००० ते १००००

जिप्‍सी २००००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com