Marigold Flowers Benefits : झेंडूच्या शेतीतून शेतकऱ्यांना फायदा मिळतो का?

Marigold Farming : झेंडूचे फुले हे पीक बिगर राजकीय असून व्यापारी पीक आहे. त्यामुळे या पिकाचे अर्थकारण देखील यामागे दडलेले आहे. नेमके झेंडूच्या फुलांचे अर्थकारण समजून घेताना अनेक प्रश्न निर्माण होतात.
Marigold Flower
Marigold Flower Agrowon
Published on
Updated on

Marigold Production : झेंडूचे फुले हे पीक बिगर राजकीय असून व्यापारी पीक आहे. त्यामुळे या पिकाचे अर्थकारण देखील यामागे दडलेले आहे. नेमके झेंडूच्या फुलांचे अर्थकारण समजून घेताना अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उकल होईलच असेही नाही. मात्र काही धागे पकडता येतील का? या फुलांच्या अर्थकारणात शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी वर्गाचा फायदा जास्त होतो.

फुलांच्या शेतीची नेमकी काय भानगड आहे? दसरा सणाच्या / उत्सवाच्या निमित्ताने झेंडूच्या फळाची मागणी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. हा पुरवठा कृत्रिमपणे कमी झालेला आहे. कारण एकीकडे २० रुपयांना १२ फुले शहरी ग्राहकांना घ्यावी लागतात, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना रस्त्यावर फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. असे का? नेमके काय घडत आहे.

दसरा, दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने फुलांची शेती करणे हा शेतकऱ्यांचं गुन्हा आहे का? फुलांना चांगली मागणी होईल या आशावादी भूमिकेतून अनेक शेतकरी फुल शेतीकडे वळले आहेत. त्यातून गुंतवणूक करून शेती फुलवली देखील आहे. मात्र शेताच्या बांधावरून शहरांपर्यंत फुले पोहचवण्याची मूल्यसाखळी नाही. शेतकरी शहरांमध्ये येऊन स्वत : फुले विकू शकता नाही. तेवढे मनुष्यबळ त्याच्याकडे नाही. ग्रुप शेती करण्यासाठी तेवढे फुल उत्पादन घेणारे शेतकरी देखील नाहीत.

मूल्य साखळी निर्माण करून शहरांमध्ये विकता येईल असा व्यवसायिकपणा / व्यापारीपणा शेतकऱ्यांमध्ये अद्याप आलेला नाही. दुसरीकडे याचा फायदा दुसरा व्यापारी आणि स्टोलवर विक्री करणारा वर्ग उचलत आहे. शेतकर्यांना वगळून शहरांमध्ये फुले विक्रीची मूल्यसाखळी तयार केली आहे, म्हणूनच महागडी फुले ग्राहकांपर्यंत पोहचतात. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही.

Marigold Flower
Marigolds Flower : कोल्हापुरात झेंडू दरात तेजी, फूल उत्पादक शेतकरी समाधानी, इतर फुलांचे दरही वाढले

दुसरीकडे सातत्याने पिकांमध्ये बदल करा. नवीन आणि व्यापारी पद्धतीने शेती करा. व्यवसायिक शेती करा. मार्केट डोळ्या समोर ठेवून पिकांची लागवड करा असे सल्ले अनेकदा शहरी अभ्यासक आणि तज्ञ देत असताना पाहण्यास मिळतात. शेतीचे उत्पादनाच्या आणि उत्पन्नाचा यशस्वी स्टोरी सांगत असतात. पण आता हा झेंडूच्या फुलाच्या निमित्ताने विरोधाभास निर्माण झाला आहे. त्याचे काय करायचे? नेमके काय घडते? कसे घडते हे समजून घेणे गरजेचे आहे.

घटस्थापनेपासून झेंडूच्या फुलांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढले, वेगवेगळ्या माळा तयार करणे, हार तयार करणे, देवीला फुले अर्पण करणे यासाठी फुलं लागतात. मात्र बाजारात फुले घेण्यासाठी गेले की, किलो, अर्धा किलो असे मिळणारी फुले ही २० रुपयांना वाटा (खुर्दा/ घट) असे मिळत असल्याचे पाहण्यास मिळाले. त्यावर विक्रत्यास विचारले हे फुले खूप महाग आहेत. आपण कसे काय फुले महाग लावली.

Marigold Flower
Marigold Flower Farming : ड्रॅगन फ्रूटमध्ये झेंडूचे आंतरपीक ठरले फायदेशीर

तर फुले विक्रतेवला काका म्हणाले, फुले मिळेनात. फुलांचा खूपच तुटवडा निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांकडून बळच एक चार-पाच किलो मिळाली आहेत. ती किलोवर विकले तर लगेच संपून जातील. त्यामुळे घटावर, वाऱ्यावर ही फुले लागली आहेत, यातून चार पैसे जास्तीचे देखील मिळतील. जेणेकरून मला फायदा होईल आणि सर्वजण घेतीलही.

फुले न मिळण्याचे काय काय? व्यापारी वर्ग फुले आणून देत नाहीत का? असे प्रश्न आहेत. फुलांची शेती कोठे-कोठे आहे, फुलांची गुणवत्ता काय आहे हे व्यापारी वर्गाला माहीत असते. ते तशी व्यवस्था करतात. तसेच बाजार समितीमध्ये देखील शेतकरी फुले घेऊन येतात. बाजार समितीमध्ये फुलांची आवक किती येते आणि कशा फुलाची आवक आहे समजते. मात्र तेथे फुलांचा लिलाव कसा काढला जातो, यावर बरेच अवलंबून आहे.

मुळात बाजार समितीमध्ये लिलाव पुकरणारे आणि व्यापारी वर्ग यांचे प्रस्थ आहे. याच संबंधातून लिलाव पुढे सुरू होतात. त्यामुळेच प्रथम फुले गुणवत्तेची असली तरीही भाव मिळण्यास मार खातात. परिणामी फुले तोडून बाजार समितीत आणण्यास परवडत नाहीत. दुसरीकडे उत्पादन खर्च वाढलेला आहे. त्या तुलनेत उत्पादन जास्त झाले तरीही भाव पडल्याने गुंतवणूक केलेला खर्च निघण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फुले तोडून बाजारात घेऊन येणे शक्य होत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com