Forest Patil : पोलिस पाटलांच्या धर्तीवर वन पाटील होणार नियुक्त

Tadoba Tiger Reserve : चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. यामुळे येथे वाघ व बिबट्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. यामुळे शिकारी टोळ्यादेखील सक्रिय होत वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे.
Forest Department
Forest DepartmentAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : महाराष्ट्र शासन वनविभाग अंतर्गत मध्य चांदा वनविभागाने वन्यजीव शिकारी टोळ्यांना आळा घालण्यासाठी व वन्यजीव संवर्धन तथा संरक्षण करण्यासाठी गावपातळीवर पोलिस पाटलांच्या धर्तीवर वन पाटील नियुक्तीचा आदेश काढला आहे.

गावपातळीवर ज्याप्रमाणे महसूल व पोलिस प्रशासनाचा दुवा म्हणून पोलिस पाटील कार्यरत आहे. त्याच धर्तीवर वनविभागाने वन्यजीव शिकारी टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी व मानव तथा वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन पाटील महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्यात वनविभागाला वन पाटील मदत करणार आहे.

Forest Department
Forest Department Scam : मंगळवेढा वनविभागात १०९ कोटी रुपयांचा अपहार

या अनुषंगाने मध्य चांदा वन विभागात पहिल्या टप्प्यात सात तालुक्यांतील ५० गावांत वनपाटील पदाची निवड करण्याचे निर्देश मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी प्रादेशिक वन विभाग अधिकाऱ्यांना दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. यामुळे येथे वाघ व बिबट्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. यामुळे शिकारी टोळ्यादेखील सक्रिय होत वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आणत आहे.

Forest Department
Forest Department : खालापुरात वणव्यांचा कहर! जंगलसंपत्तीला धोका

यावर उपाययोजना म्हणून गावपातळीवर वनपाटील पदाची निवड करून वनविभाग सहकार्य घेण्याच्या मानसिकता बाळगून आहे.यासाठी वनविभाग पहिल्या टप्प्यात ५० गावांत वन पाटील पदाची निवड करणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने २०० गावांत वनपाटील पदाची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी निवड प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे.

नऊ गावांत करणार वनपाटील नियुक्त

बल्लारपूर वन परिक्षेत्रातील अवैध शिकारी टोळ्यांना पायबंद घालण्यासाठी, अवैध वृक्षतोड थांबविण्यासाठी, मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आणि वन्यजीवांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी मदतीला वनपाटील यांची निवड केली जाणार आहे.

यासाठी वनविभागाने बल्लारपूर तालुक्यातील कळमना, कोर्टीमक्ता, किन्ही, लावारी, केमतुकूम, बामणी बेघर, मानोरा, ईटोली व विसापूर ग्रामपंचायत हद्दीतील कारवा गावात वन पाटील पदाची निवड प्रक्रिया सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com