Post Monsoon Subsidy : तीन तालुक्यांतील बाधितांना मॉन्सून्नोत्तर अनुदानाची प्रतीक्षा

Agriculture Subsidy Update : शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी मंजूर १६७ कोटी ८६ लाख ६५ हजार निधीपैकी मंगळवारपर्यंत (ता. ११) ई -केवायसी केलेल्या १२ हजार ६१२ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ कोटी ४० लाख ९१ हजार रुपयांवर अनुदान जमा करण्यात आले.
Agriculture Subsidy
Agriculture SubsidyAgrowon

Hingoli News : २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सून्नोत्तर पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीबद्दल बाधित शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी मंजूर १६७ कोटी ८६ लाख ६५ हजार निधीपैकी मंगळवारपर्यंत (ता. ११) ई -केवायसी केलेल्या १२ हजार ६१२ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ कोटी ४० लाख ९१ हजार रुपयांवर अनुदान जमा करण्यात आले.

त्यात कळमनुरी, वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांना समावेश आहे. हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप अनुदानाची प्रतीक्षा आहे. ई-केवायसी करूनही मोठा कालावधी उलटला तरी खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास विलंब लागत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Agriculture Subsidy
Agriculture Subsidy : ई-केवायसी केल्यानंतरही अनुदान मिळण्यास विलंब

मॉन्सून्नोत्तर पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ४८७ शेतकऱ्यांच्या १ लाख २३ हजार १६४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात जिरायती क्षेत्रातील १ लाख २१ हजार ७१४ हेक्टरवरील पिके व १६२ हेक्टरवरील बहुवार्षिक पिकांचा समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यासाठी राज्य शासनाने १६७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे (डीबीटी) बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे.

Agriculture Subsidy
Agriculture Subsidy Scheme : ‘सन्मान’, ‘प्रोत्साहन’चे डॅशबोर्ड बंद; आर्थिक मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

त्यासाठी विशिष्ट क्रमांक प्राप्त लाभार्थींनी सीएससी केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. आजवर संगणकीय प्रणालीवर १ लाख ६५ हजार ५४३ लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तसेच ९८ कोटी ६८ लाख ६२ हजार ३६ रुपये एवढी रक्कम अपलोड करण्यात आली आहे. संगणक प्रणालीद्वारे कळमनुरी तालुक्यातील १ हजार ५९२ लाभार्थींच्या खात्यावर ८५ लाख ३५ हजार ३४० रुपये आणि वसमत तालुक्यातील ११ हजार २० लाभार्थींच्या खात्यावर ८ कोटी ५५ लाख ५६ हजार ४६६ रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे. सर्व ५ तालुक्यांतील ५८ हजार ४०५ लाभार्थींचे ई-केवायसी तसेच ३२ कोटी ७५ लाख १७९१ रुपये अनुदान प्रलंबित आहे.

हिंगोली जिल्हा मॉन्सून्नोत्तर अनुदान वाटप स्थिती (रक्कम कोटींत)

तालुका बाधित शेतकरी अनुदान प्राप्त शेतकरी रक्कम प्रलंबित ई-केवायसी

हिंगोली ५९८१३ ०० ०० १११४०

कळमनुरी ५१२३७ १५९२० ८५३५ १३५४३

वसमत २७१६८ ११०२० ८.५५ ४८७९

औंढा नागनाथ ५७९९६ ०० ०० १२७९७

सेनगाव ६१४१९ ०० ०० १६०४६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com