Agriculture Subsidy Scheme : ‘सन्मान’, ‘प्रोत्साहन’चे डॅशबोर्ड बंद; आर्थिक मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष

PM Kisan Scheme : केंद्र शासनाकडून दोन हजार रुपये शेतकरी सन्मान निधी दिला जातो. मात्र, दिवाळीच्या तोंडावर दोन्ही योजनेचे डॅशबोर्ड बंद आहेत. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.
PM Kisan
PM KisanAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. शिवाय केंद्र शासनाकडून दोन हजार रुपये शेतकरी सन्मान निधी दिला जातो. मात्र, दिवाळीच्या तोंडावर दोन्ही योजनेचे डॅशबोर्ड बंद आहेत. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.

PM Kisan
Cotton Picking : कापसाची वेचणी, प्रतवारी, साठवण

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निधी दिवाळीनंतरही जमा होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. प्रोत्साहन निधी मिळेल, या अपेक्षेने शेतकरी आनंदात होते. त्यातच मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाचे दोन हजार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

PM Kisan
Paddy Crop Damage : पावसाने भात पिकाचे नुकसान

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळीच्या तोंडावर दोन्ही योजनांची साइटच बंद झाली आहे. परिणामी मदत न आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे. महाविकास आघाडी शासनाने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. त्यात दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. कर्जमाफीसोबत जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये दिले जाणार होते.

मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या हातात पैसे पोहोचलेले नाही. दिवाळीत शासनाकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. आता साइटच बंद झाल्याने शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com