Election Voting : साडेचार लाख प्रौढांच्या मतांवर प्रशासनाचा ‘फोकस’

Maharashtra Election 2024 : आयुष्यभर अडाणी राहिलेल्या साडेचार लाख प्रौढांना यावर्षी ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमातून’ साक्षर करण्यात आले.
 Voting Update
Voting UpdateAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : आयुष्यभर अडाणी राहिलेल्या साडेचार लाख प्रौढांना यावर्षी ‘नव भारत साक्षरता कार्यक्रमातून’ साक्षर करण्यात आले. वर्षभर चाललेल्या या कार्यक्रमातून त्यांना मतदान यंत्र, मतदार कार्ड, उमेदवार, मतदान, मतमोजणी प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व अशी माहिती देत ‘निवडणूक साक्षर’ करण्यात आले. आता या प्रौढांनी विधानसभेकरिता आवर्जून मतदान करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

प्रौढ निरक्षरांसाठी केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता मोहीम राबविली जात आहे. गेले वर्षभर या प्रौढांना वाचन, संख्याज्ञान, डिजिटल व्यवहार व अन्य माहिती शिकविण्यासोबतच मतदान प्रक्रियेचेही धडे देण्यात आले. राज्यातील अशा चार लाख ५६ हजार ७४८ निरक्षर प्रौढांची १७ मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली.

 Voting Update
Maharashtra Election 2024 : पश्चिम विदर्भात अटीतटीच्या लढती

त्यात दीडशे गुणांचे तीन पेपर देऊन चार लाख २५ हजार ९०६ प्रौढ साक्षर झाले आहेत. आजवर केवळ गावातले राजकारण ऐकून मतदान करणारे हे प्रौढ निरक्षर यंदा निवडणूक साक्षर झाले. म्हणून यंदा प्रौढांची मते ‘सोच समझकर’ पडणार आहेत.

सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

नवसाक्षर झालेल्या प्रौढांनी विधानसभेत जरूर मतदान केलेच पाहिजे, यासाठी शिक्षण संचालनालयाने (योजना) विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिलेत. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना तसे लेखी आदेश पाठविले आहेत.

या प्रौढांनी स्वत: मतदान करण्याबरोबरच आपल्या कुटुंबातील इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करावे, म्हणून स्वयंसेवकांच्या माध्यमातून या प्रौढांचे व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर अपलोड केले जाणार आहे. तसेच प्रौढांच्या अक्षरात त्यांच्या कुटुंबीयांना पत्रही पाठविले जाणार आहे. यातून प्रौढ साक्षर मतदानाचे महत्त्व सांगत मतदानाचे आवाहन करणार आहेत.

 Voting Update
Maharashtra Election : निवडणूक काळात लालपरी प्रवाशांसाठी बंद राहणार

मतदानाबाबत प्रात्यक्षिकेही

या मोहिमेत उल्हास मार्गदर्शिकेतून मतदान प्रक्रियेची सचित्र माहिती देऊन, प्रौढांकडून त्यातील काही बाबींचे प्रात्यक्षिकही करवून घेण्यात आले. मतदार यादीत आपले नाव कसे शोधावे, मतदार कार्डावरील माहिती कशी वाचावी, मतदान यंत्रावर उमेदवारांची यादी कशी असते, ‘नोटा’ बटण कशासाठी असते, मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष प्रक्रिया कशी चालते, मतमोजणी कशी होते, त्यात कुणाला किती मते पडली ते कसे ओळखावे असा संपूर्ण ऊहापोह या अभ्यासक्रमातून करण्यात आला.

साक्षरता मोहिमेत ‘मतदान शिकलेले’ प्रौढ

विदर्भ

अमरावती २४६५२, अकोला १८८८१, बुलडाणा ५२३३, यवतमाळ १२९२३, वाशीम १४०२५, वर्धा १३६७, नागपूर ७२००, भंडारा ८२६२, गोंदिया ८५०२, चंद्रपूर २८६७६, गडचिरोली ३३८७६.

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर १५५९६, परभणी १४२२७, बीड ११९३०, जालना १४२३२, हिंगोली ८७९४, नांदेड १८३९३, धाराशिव ४२२०, लातूर ३५५३.

कोकण

मुंबई शहर १८०३, मुंबई उपनगर ८६१२, ठाणे १५१५५, पालघर १३२९८, रायगड ७९०२, रत्नागिरी १३३४१, सिंधुदुर्ग २२३.

पश्‍चिम महाराष्ट्र

पुणे ९०४४, सोलापूर १७५७१, कोल्हापूर २२५०, सातारा ४२१०, सांगली ७३४३, अहमदनगर ८३९४.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक २४८३१, धुळे १०२७१, नंदुरबार १६१८३, जळगाव ४१९७५.

- महाराष्ट्र एकूण : ४ लाख ५६ हजार ७४८.

नवसाक्षर झालेल्या प्रौढांना पत्रलेखनाचा सराव व्हावा आणि त्यातून मतदान जागृती व्हावी, असे दोन्ही उद्देश ठेवून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
- राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक (योजना)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com