Maharashtra Election 2024 : पश्चिम विदर्भात अटीतटीच्या लढती

Vidarbh Election Update : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांत विधानसभेच्या १५ जागांसाठी बुधवारी (ता.२०) मतदान होत आहे.
Maharashtra Election
Maharashtra ElectionAgrowon
Published on
Updated on

Akola News : पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यांत विधानसभेच्या १५ जागांसाठी बुधवारी (ता.२०) मतदान होत आहे. प्रचारादरम्यान मतदारांचा कौल शेवटपर्यंतही स्पष्ट न झाल्याने प्रत्येक उमेदवाराची धाकधूक वाढलेली आहे. मतदार कोणत्या पक्षाला साथ देतात हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल.

अकोला पूर्वमध्ये रणधीर सावरकर (भाजप), गोपाल दातकर (शिवसेना उबाठा), ज्ञानेश्वर सुलताने (वंचित), अकोला पश्चिम विजय अग्रवाल (भाजप), साजिद खान (काँग्रेस), हरीश अलिमचंदानी (अपक्ष-वंचित समर्थित ), राजेश मिश्रा (अपक्ष), बाळापूरमध्ये नितीन देशमुख (शिवसेना-उबाठा), बळीराम सिरस्कार (शिवसेना-शिंदे), अॅड. नतिकोद्दीन खतिब (वंचित आघाडी), मूर्तिजापूरमध्ये हरीश पिंपळे (भाजप), सुगत वाघमारे (वंचित), सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार) आणि अकोटमध्ये प्रकाश भारसाकळे (भाजप), महेश गणगणे (काँग्रेस) व ललित बहाळे (परिवर्तन महाशक्ती) यांच्यात लढत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोदमध्ये डॉ. संजय कुटे (भाजप), डॉ. स्वाती वाकेकर( काँग्रेस), डॉ. प्रवीण पाटील (वंचित आघाडी) व प्रशांत डिक्कर (परिवर्तन महाशक्ती), मलकापूरमध्ये राजेश एकडे (काँग्रेस), चैनसुख संचेती (भाजप) यांच्यात थेट लढत आहे.

Maharashtra Election
Maharashtra Election 2024 : निवडणुकीसाठी एसटी सज्ज

खामगावमध्ये अॅड. आकाश फुंडकर (भाजप), दिलीप सानंदा (काँग्रेस), चिखली राहुल बोंद्रे (काँग्रेस), श्वेता महाले (भाजप) यांच्यात सरळसरळ लढती होणार आहेत. सिंदखेडराजामध्ये डॉ.. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार), मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), शशिकांत खेडेकर (शिवसेना-शिंदे), गायत्री शिंगणे (अपक्ष) यांच्यात लढत आहे.

येथे महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होत आहे. मेहकर मतदार संघात सिद्धार्थ खरात (शिवसेना-उबाठा), संजय रायमुलकर (शिवसेना-शिंदे) तर बुलडाणा मतदार संघात संजय गायकवाड (शिवसेना-शिंदे) आणि जयश्री शेळके (शिवसेना-उबाठा) अशी थेट लढत आहे.

Maharashtra Election
Maharashtra Election : निवडणूक काळात लालपरी प्रवाशांसाठी बंद राहणार

वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा व रिसोड विधानसभेच्या निवडणुकीत ५३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. रिसोड व कारंजा विधानसभा मतदारसंघात तिरंगी, तर वाशीम विधानसभेत दुरंगी लढत होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारंजा व रिसोड विधानसभा मतदार संघांत महायुती व महाविकास आघाडी व्यतिरिक्त अपक्ष उमेदवार प्रचारात रंगत आणत असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे.

रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक, शिंदे सेनेकडून भावना गवळी, अपक्ष अनंतराव देशमुख तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत सुधीर गोळे निवडणूक लढवित आहेत. कारंजात भाजपच्या सईताई डहाके, महाविकास आघाडीचे ज्ञायक पाटणी, वंचित बहुजन आघाडीचे सुनील धाबेक, वाशीममध्ये भाजपचे शाम खोडे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्यात लढत होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com