Baramati Loksabha : बारामतीत लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन ॲक्शन मोडवर

Loksabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडूनही तयारी सुरू झाली असून, मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Baramati News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडूनही तयारी सुरू झाली असून, मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार यंदाच्या लोकसभा निवडणूकीसाठी ९ फेब्रुवारीअखेरपर्यंत ३ लाख ६४ हजार ४० मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महसूल प्रशासनाने निवडणुकीच्या दृष्टीने गेल्या काही महिन्यांपासूनच तयारी सुरू केली होती. सध्या तयारी अंतिम टप्प्यात असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही केली जात असल्याचे तहसीलदारांनी नमूद केले.

Loksabha Election
Baramati Trading Association : बारामती खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम भोसले

दरम्यान, बारामती तालुक्यात ९ फेब्रुवारी अखेरपर्यंत १ लाख ८५ हजार ९२६ पुरुष, तर १ लाख ७८ हजार ०९३ महिला व २१ तृतीयपंथी असे एकूण ३ लाख ६४ हजार ०४० मतदारांची नोंद आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार बारामती विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून ७ हजार ३६२ मतदारांची नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. दुसरीकडे ५ हजार ९१३ मतदारांची नावे मृत्यू व इतर कारणांनी कमी केली आहेत. त्याच वेळेस १ हजार ४ नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

Loksabha Election
Loksabha Election 2024: टोमॅटो, कांदा, गव्हाचं पीठ, डाळ,तांदूळ विक्रीसाठी केंद्र सरकार उतरलं बाजारात

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत मतदार यादीमध्ये नवीन मतदारांचे नाव समाविष्ट केले जाणार आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने निवडणूक आयोगाने सूचना जारी केलेल्या आहेत. दररोज रात्री बारा वाजता मतदार यादी अपडेट केली जात आहे.

बारामतीत ३७६ मतदान केंद्रे ः

उपलब्ध आकडेवारीनुसार बारामती विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात ३७६ मतदान केंद्रे असतील. यात १५०० हून अधिक मतदार संख्या असलेली तीन, १२०० ते १५०० संख्या असलेली ८० मतदान केंद्रे आहेत. ज्या मतदान केंद्रावर १५०० पेक्षा जास्त मतदार संख्या आहे, अशा तीन ठिकाणी सहायकारी मतदान केंद्रे करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com