Baramati Trading Association
Baramati Trading AssociationAgrowon

Baramati Trading Association : बारामती खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम भोसले

Baramati Taluka : बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम आनंदराव भोसले यांची तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Published on

Baramati News: बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी विक्रम आनंदराव भोसले यांची तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदासाठी विक्रम आनंदराव भोसले (वाणेवाडी, ता. बारामती) यांचे तर उपाध्यक्षपदी सोनाली दादासो जायपत्रे (रा. मुढाळे, ता. बारामती) यांचे नाव बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी जाहीर केले.

अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी दोघांचेच अर्ज आल्याने सहायक निबंधक मिलिंद टांकसाळे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची स्थापना १९६३ मध्ये झाली. या संस्थेची उलाढाल ११७ कोटी रुपये असून संस्थेच्या विविध दुकानांच्या २२ शाखा कार्यरत आहेत.

Baramati Trading Association
Selling Buying Federation Election : खरेदी-विक्री संघाच्या ११ जागा बिनविरोध

कीटकनाशके, बी-बियाणे, खते, रासायनिक कीटकनाशकांचा व्यापार संघाच्या वतीने केला जातो. संघामध्ये १२६ कर्मचारी कार्यरत असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही संस्था महत्त्वाची आहे. बारामती तालुक्यातील एक प्रमुख सहकारी संस्था म्हणून खरेदी-विक्री संघाकडे पाहिले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com