Loksabha Election : ‘मविआ’कडे इच्छुकांची गर्दी

Election Update : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे नेते नवीन चेहऱ्‍याचा शोध घेत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे.
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे नेते नवीन चेहऱ्‍याचा शोध घेत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे. मात्र मतदारांना अपील होईल, असा सर्वसमावेशक चेहऱ्‍याचा अभाव आहे. जातीय समीकरणात कोण वरचढ ठरू शकतो, यावरदेखील महाविकास आघाडीचा फोकस आहे.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघावर १९९९ पासून शिवसेनेचे प्राबल्य आहे. राजकीय उलथापालथीत विद्यमान खासदार भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पसंती दिली. तरीदेखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट मतदार संघावरील आपला दावा सोडायला तयार नाही.

Maha Vikas Aghadi
APMC Election : सिल्लोड-सोयगाव बाजार समिती निवडणुकीत राज्यातील सत्ताधारीच आमने-सामने

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीतील कोणता पक्ष लढणार, याबाबत उत्सुकता आहे. मतदार संघावर शिवसेना (ठाकरे) गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या तिन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने या मतदार संघात दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी आपला दावा कायम ठेवून आहेत.

Maha Vikas Aghadi
Loksabha Election : मतदार यादीतील २७ हजार नावे वगळली

आठवडाभरापूर्वी काँग्रेस पक्षाने इच्छुकांचे अर्जही मागविलेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून दावेदारी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांची मने दुभंगली जात आहेत. शिवसेनेचा उमेदवार सातत्याने निवडून आल्याने त्यांच्याकडून दावा केला जात आहे. मात्र, आता शिवसेना (ठाकरे) गटाच्या ताकदीत विभागणी झाल्याची टिप्पणी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाकडून केली जात आहे. शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत.

उमेदवाराविषयी उत्सुकता

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे पदाधिकारीही दावा करण्यात मागे नाहीत. निवडणुकीच्या तयारीत प्रशासन व्यस्त होत असताना महाविकास आघाडीत मतदारांना भावेल, असा सर्वसमावेशक चेहरा समोर आलेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com