Shabri Naturals : ‘शबरी नॅचरल्स’च्या उत्पादनांसाठी ‘आदी-शबरी’ फेडरेशन

Tribal Empowerment : आदिवासी बांधवांच्या प्रीमियम उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ प्रयत्नशील आहे.
Women Farmer
Women's EmpowermentAgrowon
Published on
Updated on

Nashik News : आदिवासी बांधवांच्या प्रीमियम उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ प्रयत्नशील आहे. आदिवासी बांधवांच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना एकत्र करुन ‘आदी-शबरी’ या नावे फेडरेशन तयार करण्यात आले आहे. या फेडरेशनला केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयाने मान्यता दिली असल्याने शबरी नॅचरल्ससाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

अल्पावधीत देशभरात प्रसिद्ध झालेल्या ‘शबरी नॅचरल्स’ या ब्रॅण्डला फक्त महामंडळाच्या अखत्यारित न ठेवता आदिवासी बांधवांसाठी संघटित पद्धतीने फेडरेशन तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या प्रीमियम उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी विशेष फेडरेशनची आवश्यकता होती. महामंडळाच्या ५० आदिवासी शेतकरी उत्पादक कंपन्यांना एकत्र करून महामंडळाने आदी शबरी फेडरेशनची स्थापना केली आहे. यामध्ये महामंडळाची सहायक अशी भूमिका असणार आहे.

Women Farmer
Tribal Products: आदिवासी बांधवांची प्रीमियम उत्पादने देशविदेशात मिळणार एका क्लिकवर

शबरी नॅचरल्सची उत्पादने तसेच त्याबाबतचे सर्व निर्णय फेडरेशन घेणार आहे. या बाबत मंजुरीसाठी केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सर्व पडताळण्या पूर्ण झाल्यानंतर आता केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालयाने याला मंजुरी दिली आहे.

Women Farmer
Thane Tribal Protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांची धडक

शबरी नॅचरल्सबाबत यापूर्वीच गुणवत्ता, मोजमाप आणि यंत्रे याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी भारत सरकारद्वारे असलेल्या उद्यमची नोंदणी प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे.

आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी बांधवांचे जीवनमान, त्यांची संस्कृती जपणे यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात. त्यासाठी शबरी नॅचरल्स हा एकछत्री ब्रँड तयार करण्यात आला आहे. या ब्रॅण्डला सर्वतोपरी शासकीय मान्यता मिळाल्या आहेत. ‘आदि-शबरी’ फेडरेशनला मान्यता मिळाली असून लवकरच त्याकडे हस्तांतर होणार आहे.
- लीना बनसोड, आयुक्त, आदिवासी विकास विभाग तथा व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com