Bhimashankar Darshan: श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी जादा बस

Shravan 2025 Update: श्रावणात श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक पुणे जिल्ह्यात येतात.
Bhimashankar Temple
Bhimashankar TempleAgrowon
Published on
Updated on

Pune News: श्रावणात श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक पुणे जिल्ह्यात येतात. या भाविकांच्या सुविधेसाठी पुणे एसटी विभागाकडून शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरूनगरसह १२ आगारांतून शनिवार आणि रविवारी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले.

येत्या २५ जुलैपासून श्रावण सुरू होत असून, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. पहिला श्रावणी सोमवार २८ जुलै असून शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दोन दिवस आधीपासूनच भाविकांची भीमाशंकर मंदिर परिसरात मोठी गर्दी होते.

Bhimashankar Temple
Bhimashankar Development Plan: भीमाशंकरच्या २८८ कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता

तर उत्तर भारतीयांचा श्रावणी सोमवारी (ता. १४) जुलैपासून सुरू झाल्यामुळे भीमाशंकरला भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, हे भाविक महाराष्ट्रासह विविध राज्यांतून पुण्यात येतात.

Bhimashankar Temple
Bhimashankar : श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या पायरी मार्गाचे होणार रुंदीकरण

त्या भाविकांना भीमाशंकरला जाण्यासाठी शिवाजीनगर आगारातून १०, तर पुणे विभागातील शिरूर, एमआयडीसी आगार वगळता अन्य सर्व आगारांतून एकूण ४६ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पाच दिवस जादा गाड्या 

२८ जुलै, ता. ४, ११ आणि १८ ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आहे, तर त्याआधी शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे आठवड्यातील पाच दिवस (शुक्रवार ते मंगळवार) जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बारामती येथील सोमेश्वर यात्रेसाठीही बारामती येथून ६ आणि एमआयडीसी येथून ४ असे एकूण १० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com